ताणाचं व्यवस्थापन करताना…

0
280

आजच्या या वेगवान आणि स्पर्धेच्या युगाची मोठी ‘देणगी’ म्हणजे ताण! लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सा-यांच्याच पाचविला हा ताण पुरलेला आहे. त्याचे नकारात्मक परिणाम कमी करण्याचा रामबाण उपाय म्हणजे त्याचं व्यवस्थापन!
सुरूवातींला ‘ताण’ म्हणजे काय ते समजून घेऊ.

‘ताण’ म्हणजे मनाची अशी अवस्था, ज्यामध्ये व्यक्तीला परिस्थितीशी जुळवून घेता येत नाही. अशी तापदायक स्थिती निर्माण होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. छोट्या मोठ्या चिंतांपासून मोठ्या सामाजिक समस्यांपर्यंत कशाचंही फलित म्हणून व्यक्तींमध्ये ताण निर्माण होऊ शकतो.

ताण निर्माण करणारे अनेक घटक असतात. त्याचं प्रामुख्याने तीन भागामध्ये विभाजन केलं जातं.

* अकस्मिक घटना
* व्यक्तिगत घटना
* नित्य घटना

अकस्मिक घटना : यामध्ये नैसर्गिक आपत्ती, राजकीय संकट इत्यादींचा समावेश होतो. यामुळे व्यक्तींवर ताण येऊ शकतो.
व्यक्तिगत घटना : यामध्ये प्रामुख्याने प्रिय व्यक्तींचा आजार, वियोग, मृत्यू, वैयक्तिक अपयश यांसारख्या घटनांचा व्यक्तीवर परिणाम होतो.

नित्य घटना : रहदारीत अडकणे, प्रदुषण, अतिरिक्त आवाज यामुळे व्यक्ती ताणाला सामोरी जात असते.
वरील तीन कारणांपैकी नैसर्गिक आपत्ती ही घटना इतर दोन कारणांपेक्षा कमी प्रमाणात घडणारी आहे. पण उर्वरित दोन कारणं मात्र आपल्याला सतत ताणाखाली ठेवत असतात. सततच्या ताणामुळे व्यक्तींमध्ये शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर दोष, आजार निर्माण होऊ शकतात.

म्हणूनच या ताणाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मग कसे करायचे ताणाचे व्यवस्थापन? याचे सर्वात सोपे उत्तर आहे, ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।।

मनातला ताण निघून गेला की मन प्रसन्न होते. मनात प्रसन्नता भरली की ताणाला जागाच उरत नाही. पण बोलणे सोपे आणि करणे अवघड असे असते. अवघड असले तरी अशक्य नक्कीच नाही. मन नक्कीच पाहू.
.
ताणाची परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा अशी परिस्थितीच निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्या. आपण आपल्या आयुष्यात जर डोकावून पाहिले तर असे लक्षात येते की आपण आपल्याला ताण देणारी कारणे, घटना साधारणतः सारख्याच स्वरूपाच्या आहेत.

आपण त्याच त्याच चुका करून स्वतःला त्याचे परिस्थितीत आणून उभे करतो. त्यातून काही तरी शिकायला हवे. यामुळे पुन्हा तशाच प्रकारचे प्रसंग आल्यास ते हुशारीने टाळता येतील.

नाही म्हणायला शिका : बरेचदा एखादी गोष्ट करणे आपल्याला शक्य नसते. हे आपल्याला माहिती असते. पण जेव्हा कोणी आपल्याला एखादे काम सांगते तेव्हा ती व्यक्ती दुखावली जाऊ नये, व्यक्तीचा मान राखावा म्हणून अशा विविध कारणांसाठी आपण ते काम करण्याची तयारी दर्शवतो.

अशी संमत्ती देमे म्हणजे ताणाला सुरूवात होणे होय. कार्यबाहुल्यामुळे किंवा शारीरिक अक्षमतेमुळे हे अतिरिक्त काम आपल्यावर बोजा बनते. ते काम पूर्ण होईपर्यंत आपण स्वतःला तणावाखाली ठेवतो. हे सगळे आपल्याला टाळता येऊ शकते. फक्त ‘नाही’ म्हणायला शिकायला हवे. अगदी अदबीने, योग्य कारणे देत, स्पष्टपणे ‘मला जमणार नाही,’ हे सांगता आलेच पाहिजे.

परिस्थिती मान्य करा : सभोवतालची बिघडलेली परिस्थिती स्वीकारणे खूप महत्त्वाचे असते. काही वेळेस ती आपल्या हाताबाहेरची असते. अशावेळी परिस्थिती आहे तशी स्वीकारा. स्वतःला हेही सांगा की ही परिस्थिती आज ना उद्या बदलणार आहे. अशा वेळी आपल्या हातात जे आहे ते आणि तितकेच करा. थरळीं रपव ुरींलह असे धोरण ठेवा.

माघार घ्यायला शिका : वैयक्तिक स्तरावर ताण निर्माण करणा-या अनेक घटना आपल्या हटवादीपणातूनच जन्म घेत असतात. थोडी माघार घेतली तर यातल्या ब-याच घटना टाळता येऊ शकतात. परंतु फक्त मी म्हणेन तीच पूर्व दिशा अशा दुराग्रही मनोवृत्तीमुळे आपण तणाव ओढवून घेतो. यापेक्षा परिस्थितीचा इतरांनी मांडलेल्या मुद्यांचा तर्कसंगत विचार करून जर तडजोड करता आली तर आपण त्यामुळे आनंदी राहू शकतो.

अनुकूलन : परिस्थितीशी मिळते जुळते घेण्यासाठी प्राणी, पक्षी, फुले स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. सजीवांचे हे अनुकूलन आपल्या मनोवृत्तीलाही लागू करता आले तर किती छान होईल. पाण्यात कमळ त्यावरच्या तेलकट आवरणामुळे ओले होत नाही. देठावरच्या पोकळ फुग्यामुळे बुडतही नाही. आपल्या सभोवतीच्या परिस्थितीशी अनुकूलन घेण्यासाठी वनस्पतीने स्वतःमध्ये बदल केले आहेत.

मग आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा विपरित परिणाम आपल्या मनावर परिणाम होऊ न देण्यासाठी आपल्या मनावर परिणाम होऊ न देण्यासाठी आपल्यालाही थोडसे अलिप्त राहता यायला हवे. परिस्थितीकडे ‘त्रयस्थ’ म्हणून पाहायला शिकले तर हे निश्चितच जमेल.

नव्या वाटा शोधा : आपण ठरवलेल्या मार्गवरून नसेल तर पर्यायी मार्ग शोधा. उदाहरणार्थ, मला बारावीमध्ये कमी मार्क मिळाले म्हणून सगळे संपले असे नाही. आपल्या बौद्धिक, शारीरिक क्षमता, आवडी लक्षात घेऊन नवीन क्षेत्रात वाटचाल सुरू केली तर तिथे घवघवीत यश मिळवता येते. र्जीीं ेष लेु ींहळपज्ञळपस मुळे अनेक पर्याय प्रत्येक अवघड परिस्थितीसाठी मिळवता येतात. त्यामुळे तणावापासून स्वतःला वाचवता येते.

 

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here