UGC NET Exams 2021: यूजीसी नेट उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

हायलाइट्स:

  • यूजीसी नेट उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
  • लवकरच जाहीर होणार प्रवेशपत्र
  • अधिकृत वेबसाइटवर मिळेल सविस्तर माहिती

UGC NET Exams 2021: यूजीसी नेट परीक्षार्थींसाठी महत्वपूर्ण माहिती आहे. राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET Exam 2021) साठी प्रवेशपत्रे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे लवकरच हॉल तिकीट जाहीर करण्यात येणार आहे. मीडिया वृत्तानुसार यूजीसी पोर्टलवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर अपलोड केले जाऊ शकते. मागच्यावर्षी एनटीएकडून परीक्षा सुरू होण्याच्या किमान ५ दिवस आधी प्रवेशपत्र जाहीर केले. त्यामुळे आज हॉल तिकीट दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्रवेशपत्राशी संबंधित तपशीलांसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तसेच यूजीसी नेट डिसेंबर २०२१ ही डिसेंबर आणि जून सायकल परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर परीक्षेसंबंधी अधिक अपडेट मिळू शकणार आहे.

उमेदवारांनी यूजीसी नेट प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर त्यावर जाहीर केलेल्या तारखेला, शिफ्टला आणि वेळेत परीक्षेला बसावे लागेल. प्रवेशपत्र हे अनिवार्य कागदपत्रांपैकी एक आहे आणि उमेदवारांना ते परीक्षा केंद्रावर घेऊन जावे लागेल. उमेदवारांनी प्रवेशपत्रासाठी फोटो सोबत नेणे देखील अनिवार्य आहे. या अंतर्गत उमेदवार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर कोणतीही कागदपत्रे आणू शकतात. शिवाय, परीक्षेचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर लवकरच जाहीर केला जाईल.

उमेदवारांनी यूजीसी नेट प्रवेश पत्र २०२१ मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून परीक्षेदरम्यान त्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार ugcnet.nta.nic.in या वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. यात काही अडचणी आल्यास ते एनटीएच्या हेल्पलाइनवर सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० दरम्यान संपर्क साधू शकतात किंवा एनटीएचा ईमेल आयडी ugcnet@nta.ac.in वर लिहू शकतात.

परीक्षेच्या तारखांमध्ये बदल
तारीख २०२१ अधिसूचनेनुसार, आधी ही परीक्षा ६ ते ८ ऑक्टोबर आणि १७ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार होती. पण १० ऑक्टोबर रोजी काही परीक्षा यूजीसी नेट परीक्षेशी क्लॅश होत होत्या. त्यामुळे यूजीसी नेट परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला. यानंतर परीक्षेचा सुधारित कार्यक्रम जारी करण्यात आला, यानुसार यूजीसी नेट परीक्षा १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्याचे ठरले. यानंतर यूजीसीने ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र, National Testing Agency (NTA) ने म्हटले होते की, विविध राज्यांमध्ये विविध पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा तसेच विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा होत आहेत. अनेक परीक्षांच्या तारखा क्लॅश होत आहेत. तूर्त ऑक्टोबरमध्ये अन्य परीक्षा झाल्यानंतर २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत परीक्षा होणार आहेत.

यूजीसी नेट परीक्षा पॅटर्न
यूजीसी नेट परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. प्रत्येक विषयासाठी दोन पेपर असतात. पेपर १ मध्ये MCQ प्रकारचे ५० प्रश्न असतात आणि पेपर २ मध्ये MCQ प्रकारचे १०० प्रश्न असतात. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तीन तासांचा वेळ दिला जातो. प्रत्येक योग्य उत्तरासाठी २ गुण असतील.

Source link