स्पर्धेत जिंकायचे तर…

0
513

एखादं उद्दिष्ट पूर्ण झालं की थोडं थांबलं, असं सध्याच्या जगात चालत नाही. किंबहुना, थांबणा-यांना इथं वावच नाही. तुम्हाला स्पर्धेत जिंकायचे असेल, तर वेगानं एकामागोमाग अनेक उद्दिष्टं तुम्हाला गाठावीच लागतील. ‘योग्य नियोजनासोबत प्रभावी आणि गतीने अंमलबजावणी हे यशाचे गमक आहे.’

नेपोलियन यशोशिखरापर्यंत पोहोचण्यासाठीचा मंत्र काय, याचे अगदी तंतोतंत वर्णन नेपोलियननं वरील वाक्यात केलं असल्याचं आपल्याला जाणवेल. वैयक्तिक आयुष्यासह ‘प्रोफेशनल लाईफ’ मध्ये यशाची चव चाखण्यासाठी हा मंत्र सर्वांत उपयोगी पडू शकतो.

आयुष्याला गती हवी, गतीशिवाय जीवनाला खरोखरीच काही अर्थ नाही, जीवन हे गतीमान आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील स्मर्धेच्या युगात योग्य ‘स्पीड’ राखू शकलो नाही तर… काय परिणाम होऊ शकतात, याची कल्पना येथे काम करणा-या युनिअर्सपासून टॉप लेव्हलपर्यंत सर्वांनाच असेल.

क्तएखादं उदिष्ट पूर्ण झालं की थांबलं, असं सध्याच्या जगात चालतं नाही, किंबहुना, थांबणा-यांना इथं वावचंं नाही. तुम्हाला स्पर्धेत जिंकायचं असेल, तर वेगानं एकामागोमाग अनेक उद्दिष्ट तुम्हाला गाठावीच लागतात.

काम समजून घेण्याची ग्रहणशक्ती आणि त्यानुरूप काम पूर्ण करण्यासाठी घेत असलेला वेळ या दोन गोष्टींवर तुमच्या करिअरची प्रगती होणार की अधोगती हे ठरत असतं. त्यामुळं, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणा-या कोणालाही वेगाकडं दुर्लक्ष करून चालत नाही.

क्तकॉर्पोरेट क्षेत्रात वेगानं, गतिमानतेनं काम करणंं कोणालाही चुकलेलं नाही. व्यवसायात वेगानं प्रगती व्हावी ही उद्योजकांची इच्छा असते, ग्राहकांना कमीत कमी वेळेत गुणवत्तापूर्ण माल हवा असतो, कर्मचा-यांना गतिमान प्रगती हवी असते, तर गुंतवणूक करणा-यांना त्यावर योग्य ‘रिटन्र्स’ हवे असतात. त्यामुळं, प्रत्येकजण रोजच्या कामात काही ना काही इम्पू्रव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो.

‘रूटीन’ कामेही अधिक वेगाने व्हावी, यासाठी कंपन्यांच्या विविध खात्यांमध्ये तंत्रज्ञानाचाही आधार घेण्यात आला आहे. याचा फायदा तुमचं एखादं काम लवकर संपल्यावर पुढच्या कामावर अधिक लक्ष देणं आणि त्यानुसार सर्व प्रक्रिया अधिक वेगानं पूर्ण करणं शक्य होतं.

वेगानं, त्वरेनं काम करण्यासाठी खाली दिलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी कायम लक्षात ठेवा…
क्तत्वरेनं काम करण्याची सवय लावून घ्या : काम वेगानं करण्यासाठी तुम्ही काय प्रकारचं काम करता किंवा पद काय, या गोष्टी महत्त्वाच्या ठरत नाहीत. त्यामुळं, तुमच्या हातातलं काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या आणि तुमच्या काम करण्याच्या वेगाची तुलनाही करू नका. तुमचा कामातील वेग वाढवण्यासाठी मात्र नेहमी प्रयत्नशील राहा.

क्त गेट टू द पॉर्इंट : एखादी गोेष्ट करायची असं ठरवल्यावर कोणत्या पद्धतीनं करायची, त्यासाठी काय प्रक्रिया असेल, इतर कोण बरोबर असतील, या सगळ्याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वत:पासून तातडीने त्यावर काम सुरू करा.

एखादं काम काय आहे, हेच नीट समजून न घेतल्यानं अनेकांची अळम-टळण करण्याची वृत्ती वाढते. त्यामुळं. विषय समजला नसेल, तर त्याबदल माहिती घ्या आणि त्वरेनं त्यानुसार कामाला सुरूवात करा. तुमच्या कामात अर्जन्सी हे जाणवलं की, ते वेळेत पूर्ण होणार, याची खात्री समोरच्यांनाही होऊ शकते.

क्त शार्ट डेडलार्ईन्स ठेवा : एखादं काम पूर्ण करण्यासाठी ‘शॉर्ट डेडलाईन’ ठेवा. यामुळं, तुम्हाला प्राधान्यानं कोणतं काम आधी करायचं, यावर योग्य लक्ष केंद्रित करता येऊ शकेल. यासाठी रोजच्या रोज ‘दिवसभरात या गोष्टी करायच्या आहेत’ असं लिहून ठेवायची सवय अंगी बाणवलीत, तर संबंधित कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकाल. शार्ट डेडलाईनमुळं हातातल्या कामावर अधिक एकाग्रता साधता येऊ शकेल.

हे केवळ हातातल्या कामाबाबतचं आहे असं नाही, तर कोणत्याही मीटींगसाठी देखील ठराविक कालावधी निश्चित करा आणि त्या वेळेतच ती पूर्ण करण्याचा कसोशीनं प्रयत्न करा. यामुळं, तुमच्याबरोबरच तुमच्या सहका-यांचा वेळ वाचेल आणि तो अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी वापरता येऊ शकेल.

क्त कल करे सो आज, आज करे सो अब : दिवसभरातलं सगळं काम शक्यतोवर आजचं घरी जाण्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उद्या आल्यावर करू, हा अ‍ॅटिट्यूड नुकसान करू शकतो किंवा आजचं काम उद्यावर ढकललंत की, दुसरं एखादं काम पूर्ण करण्यास आणखी वेळ लागू शकतो. त्यामुळं, ‘कल करे सो आज, आज करे सो अब’ ही उक्ती कायम लक्षात ठेवा.

क्त शिकण्याचा ध्यास ठेवा : कॉर्पोरेट काम करताना नवनवी कौशल्यं, पद्धती आणि तंत्रज्ञान शिकून घेण्यासाठी सतत तयार राहा. नव्या बदलांचा स्वीकार करून स्वत:ला मोल्ड करण्यात यशस्वी झालात, तर तुमचं काम इतरांपेक्षा अधिक वेगवान होईल, यात शंका नाही.

नवी कौशल्यं आणि तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळं तुमच्या कामीतील अचूकताही वाढू शकेल. रोजच्या कामातून नवं काहीतरी शिकण्याचा ध्यास ठेवलात, तर प्रगतीपथावरून वाटचाल करणं सोपं होईल.

क्तवेगवान हालचाली, त्वरेनं काम हातावेगळं करण्याची कुवत आणि काम झटपट संपवण्यासाठीची धडपड तुम्हाला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये यशाच्या मार्गावर नेण्यात महत्त्चाची भूमिका बजावणार आहे.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here