नोकरीक्षम बनण्यासाठी…

0
253

माणसांना स्वभाव असतो तसा प्रत्येक शैक्षणिक वर्षालाही एक स्वभाव असतो. पहिले वर्ष नव्या नवलाईचे, सगळ्या गोष्टी लई भारी वाटण्याचे असते. दुसरे वर्ष कॉलेजमध्ये जुने झालो या टाईपचे, तर तिसरे वर्ष किंवा शेवटचे वर्ष भविष्याचा विचार करणारे असते.

अभ्यास, कॅम्पस इंटरव्ह्यू आणि नोकरी मिळवायच्या प्रयत्नांचे असते. प्रोफेशनल लाइफची सुरुवात होण्याचा हाच टप्पा असतो. या वर्षाचा मूड नॉस्टेल्जिक आणि फील ख-या वास्तवाची जाणीव करून देणारा असतो. अभ्यास, शिक्षक, त्यांची शिस्त, कॉलेजची शिस्त, ती मोडून काढून केली जाणारी धमाल, मित्र-मैत्रिणी, त्यांचा रोजचा सहवास यातून बाहेर पडताना मनात असलेली भीती या सगळ्याचे मिश्रण या शेवटच्या वर्षांत पहायला मिळते. याच वळणावर नोकरी मिळते आणि मग प्रोफेशनल म्हणून एक वेगळा प्रवास सुरू होतो.

‘आपण जे शिकलो आहे तेच तर वापरायचे आहे. मला कायम फस्र्ट क्लास आहे. तेव्हा काम करणे माझ्यासाठी फारसे कठीण नाही’ असा समज घेऊन ‘हुशार क्लास’ मधील मुले आणि अभ्यासात थोडे कमी असलेले विद्यार्थी ‘आपले कसे होणार’ , याची चिंता मनात घेऊन नोकरीच्या पहिल्या दिवसाला सामोरे जातात.

नोकरीतले पहिले काही दिवस ट्रेनिंग, ओळख करून घेणे, एचआर संबंधित कामे पूर्ण करणए यांमध्ये निघून जातात. मग खरे काम सुरू होते. तुम्ही म्हणाल खरे काम म्हणजे काय? खरे काम म्हणजे जे शिकलो ते वापरायची वेळ येणे म्हणजे ख-या कामाला सुरुवात होणे.

अभ्यासक्रमाचा भाग म्हणून, प्रोजेक्टची गरज म्हणून काही वेळ लॅबमध्ये प्रोग्रॅमिंग करणे, मेकॅनिकल लॅबमध्ये काम करणे वेगळे होते. प्रोजेक्ट चांगलाच व्हायला हवा यासाठी कष्ट घेतले जातात. रिझल्ट थोडा चुकला तरी चालतो. नोकरीमध्ये तुम्ही एकटे जबाबदार असता.

एरवी मित्रत्वाने वागणारा बृस एखाद्या वेळी झालेली चूक सांभाळून घेतोही, पण चूक होते तेव्हा मित्रत्व वैगरे बाजूला ठेवून सगळ्यांसमोर ‘पुढच्या वेळी क्षमा नाही’ असेही सांगायला कमी करत नाही. या वेळेपर्यंत केवळ पुस्तकी ज्ञान पक्के असून भागत नाही ही गोष्ट पूर्णपणे समजलेली असते.

हा पहिला फरक विद्यार्थी दशेतून बाहेर येताना पचवावा लागतो. नोकरीमध्ये तुम्ही जे शिकलात, त्याचे प्रॅक्टिकल अ‍ॅप्लिकेशन करावे लागते. पुस्तकाबरहुकूम काम होत नाही, कामाच्या आवश्यकतेप्रमाणे आणि गरजेप्रमाणेच त्याचा उपयोग करावा लागतो हे समजून घ्यावे लागते.

कामातल्या अडचणी सोडवण्यासाठी, त्यामध्ये तज्ज्ञ होण्यासाठी अनुभवाची गरज असते. या गोष्टींची जाणीव कामाच्या पहिल्या काही दिवसांमध्येच होते.
आपण ज्या विषयामध्ये शिक्षण घेतो आहोत, त्या फिल्डमधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव शिकताना घेतला, तर आपण जे शिकतो, जे वाचतो ते अधिक चांगल्या प्रकारे समजते.

त्यातूनच आपल्या पुस्तकी ज्ञानाला प्रॅक्टिकलची जोड मिळते. अर्थात, यासाठी इंडस्ट्रीनेही सपोर्ट केला पाहिजे. किती विद्याथ्र्यांना संधी देणार असे न म्हणता भविष्यात आपल्याला चांगली माणसे मिळावीत यासाठी विद्याथ्र्यांना कामाची संधी दिली पाहिजे.

कॉलेजमध्ये असतानाच जर आपल्या फिल्डमधील अनुभव घेणे शक्य झाले तर जरूर घ्या. तुमची काम करण्याची कळकळ इंडस्ट्रीला समजावून दिलीत, तर तुम्हाला कामाचा अनुभव घेणे नक्कीच शक्य आहे. त्याचा उपयोग तुम्हाला लवकरात लवकर ‘प्रोफेशनली सेटल’ व्हायला कारण ठरणार आहे

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here