यशस्वी भव Ÿ।

0
193

आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर अनन्यसाधारण परिणाम करत असतो. आपल्या विचारारच आपण कसे असू हे ठरत असते. यश आणि अपयश हे सर्वस्वी आपल्या विचारप्रक्रियेवरच अवलंबून असते. जवळजवळ सारख्याच व्यक्तिमत्त्वाची, बुद्धीची आणि शैक्षणिक पाश्वभूमी असणा-या दोन व्यक्तिंच्या यश आणि अपयशात जमीन अस्मानाचा फरक असू शकतो.

याचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, यशस्वी व्यक्तीने सकारात्मक पद्धतीने विचार केला. आणि अयशस्वी व्यक्तिने नकारात्मक प्रकारे विचार केला तर त्या विचारांच्या प्रभावाने दोहोंंचे यश अपयश ठरले. प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून यश अपयशाची व्याख्या वेगळी असू शकते.

यशस्वी व्यक्तीचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा ‘पॉझिटिव्ह’ असतो, तर त्याच गोष्टीकडे अपयशी व्यकनती निगेटिव्ह दृष्टीने पाहते. ही विचारप्रक्रिया दोहोंच्या यश अपयशातील अंतर ठरवत असते. गिगेटिव्ह दृष्टीने विचार करणा-या व्यक्तिला प्रत्येक घटनेत अडथळे दिसतात. तर ‘पॉझिटिव्ह’ व्यक्ती प्रत्येक घटनेकडे एक संधी म्हणून पाहात असते.

आपले व्यक्तिमत्व, हावभाव हे आपल्या विचारांचा परिपाक आहे. एखाद्या ठिकाणी जर आपण इंटरव्ह्यूला गेलो आणि ही नोकरी आपल्याला मिळणार आहेच अशा विचारप्रक्रिया जर आपली असेल तर आपल्या बॉडीलँग्वेजमधून पदोपदी इंटरव्ह्यू घेणा-या व्यक्तीला आपला पॉझिटिव्हनेस जाणवत असतो.

आणि शेवटी त्याचा परिणाम आपल्याला मिळणारच नाही शी आपली विचारप्रक्रिया असेल तर आपल्या बॉडिलँग्वेजमधून सतत निगेटिव्हीटी झळकत असते आणि परिणामी अपेक्षित यश साधले जात नाही.
आपल्या मनातील नैराश्य, औदासिन्य या भावना आपल्या चेह-यावर दिसून येतात. आणि समोरच्या व्यक्तिला जाणवण्याइतपत त्याचा प्रभाव होतो.

त्यामुळे व्यक्तिमत्वात एक प्रकारचा गंभीर दोष तयार होऊ शकतो. निसर्गाचे चक्र असे अव्याहतपणे चालू आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा आणि हिवाळा तशाच आपल्या मनातील भावनाही सतत बदलत असतात. निराशात्मक परिस्थिती ही प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असते, पण त्या परिस्थितीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून, विचारातून पाहतो यावरच आपले भविष्य अवलंबून असते.

प्रत्येक परिस्थितीचा सामना करुन जो खंबीरपणे उभा राहतो त्याने व्यक्तीमत्वाला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय सोन्यालाही झळाळी येत नाही. तसेच आपलेही आहे.

आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन जर सकारात्मक ठेवला तर घडून येणा-या घटनाही सकारात्मकच घडून येतात आणि आपली बॉडी लँग्वेज, विचार हे सर्वच सकारात्मक असल्याने यशाकडे होणारी आपली वाटचाल ही अग्रक्रमाने होत जाते.
व्यकिमत्त्व विकासाच्या प्रक्रियेत अनेक छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी समाविष्ट आहेत. त्या प्रत्येक गोष्टीवर सूक्ष्म काम करत गेल्यानंतर आपल्या व्यकिमत्वात बदल होत जातात.

व्यक्तिमत्व विकास ही एक सर्वस्वी स्वत:वर अवलंबून असणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेकडे आपण थोडीजरी डोळेझाक झाली तरी, मिळणारा परिणाम गंभीर अपयश देऊ शकतो. सकारात्मक विचार प्रक्रियेला आपण प्रयन्तपूर्वक अंगिकारले तर निश्चितच त्याचे फळ आपल्याला मिळेल. मनात निर्धार करा की मी कमीत कमी नकारात्मक विचार करेन आणि हळूहळू सकारात्मकतेकडे प्रस्थान करुन माझ्या व्यकिमत्त्वात नित्य नवीन बदल करत जाईल.

सक्सेससाठी थॉट्सच्या काही टिप्स…
* भावनांना तुमच्यावर वरचढ होऊ देऊ नका, तुम्ही त्यांच्यावर वरचढ व्हा.
* सभोवतालच्या व्यक्तिंचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे नकारात्मक व्यक्तिंपासून चार हात लांब राहा.
* आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला आतून छान वाटेल. योग्य आहार आणि व्यायामाची जोड द्या.
* तुम्हाला आवडणा-या तुमचं मन प्रसन्न करणा-या गोष्टी आसपास ठेला. उदा. सुंदर फोटोग्राफ्स, मनाला भावणारे संगीत, सुंदर फुलझाडे इत्यादी.
* कोणत्याही गोष्टीकडे पूर्वग्रह दृष्टिकोनातून न पाहता फ्रेश अ‍ॅप्रोचने बघा.
* प्रत्येक गोष्टीचे सकारात्मक पैलू कोणते हे लक्षात ठेवा.
* निराशेच्या गर्तेकडे घेऊनन जाणारे नकारात्मक विचार वेळीच ओळखा, कारण ते तुम्हाला निश्चितच अपयशाकडे नेतील.
* सर्वच गोष्टी आपल्याला कळतील असे नाही. गरज असल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कारण घटना आणि तपशील स्पष्ट झाल्यास योग्य निर्णय घेता येतो.
* प्रत्येक टप्प्यावर निर्णय घ्यावा लागतो. स्वत:ची निर्णयक्षमता सतत वाढवत चला.
* टीम म्हणून काम करताना सकारात्मताही चमत्कार वाटावा, असा प्रभाव टाळू शकतो.
* या सर्व गोष्टींची सुरुवात करा. सुरुवात करणं सोपं आहे. सातत्य ठेवणं अवघड पण प्रयत्नसाध्य आहे. ‘सकारात्मक विचार’ हीच जीवनपद्धती बनेपर्यंत प्रयत्न करत राहा. यश तुमचचं असेल..

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here