समस्यांची उकल

0
204

निराशावादी माणसाला प्रत्येक संधी ही समस्या वाटते, तर आशावादी माणसाला प्रत्येक समस्या ही संधी असते. स्वयंविकासाची, नवे काही शिकण्याची, समस्या आली की हातपाय गाळून बसायचं की तिची उकल करायच्या मागे लागायचं यावर त्या व्यक्तीचा विकास ठरतो. ब-याचवेळा समस्या भलतीकडेच असते आणि आपण मात्र तिची उकल भलत्याच दिशेला करत असतो.

हेन्री कैसर म्हणायचा, ‘मी नेहमी समस्या या कर्मचा-यांच्या वेशातल्या संधी आहेत, असे समजतो.’
यासाठी आपल्या समस्या या सबबी होणार नाहीत ना, याकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे. शिवाय समस्या सोडवण्याचे प्रयत्न अध्र्यावर सोडून देऊ नयेत. ब-याच लोकांच्या बाबत समस्या न सोडवणे वा प्रयत्न अध्र्यातून सोडून देणं हिच खरी समस्या होऊन बसते.

कित्येक वेळा समस्येतच तिच्या उकलीचं बीज सापडतं.
आयुष्यातील अत्युच्च गौरवाचे क्षण हे सर्वोच्च यश जेव्हा मिळाले, तेव्हाचे नसतात. तर ज्यावेळी आपण अगदी निराश बनता, हताश होता, पण त्याचवेळी एक आव्हान असं मानून समस्यांची उकल शोधण्यासाठी झेप घेतो, त्यावेळी आपल्यासोबत असतात.
समस्यांची उकल करण्याचे चार मार्ग उपलब्ध असतात…

समस्या आली की फक्त कुरकूर करत राहणे, समस्या आहे तशी स्वीकारणे आणि गप्प बसणे, समस्येची उकल शोधण्याचा प्रयत्न करणे,समस्या अधिक बिकट होणार नाही आणि तिचा परत उद्भव होणार नाही, याचा बंदोबस्त करणे.
यापैकी पहिले दोन पर्याय नकारार्थी, तर नंतरचे दोन पर्याय होकारार्थी आहेत.

यापैरी कोणता पर्याय आपण स्वीकारला यावर समस्येची उकल होणार की आपण तिला शरण जाणार हे ठरणार असते. यासाठी ‘समस्या येणार’ या केवळ भीतीनं घाबरून जाऊ नका.

‘समस्यांची उकल’ शोधण्यासाठी समस्यांचे मूळ शोदण्याकडे अधिक लक्ष द्या.
त्याच त्या ‘समस्या’ पुन्हा उद्भवणार नाहीत, याकडे लक्ष द्या.
प्रत्येक समस्येतून नवीन काय शिकायला मिळेल, ते पाहा.

समस्या सोडविण्यासाठीच आपली नेमणूक आहे ही धारणा बाळगा.
असे केले तर प्रत्येक समस्या ही एक संधी हे सूत्र निश्चित पटेल.

 

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here