मंत्र सेल्फ अर्निंगचा

0
205

परीक्षा संपल्यावर काय काय करायचं प्लॅन्स परीक्षेपूर्वीच
कॉलेज कट्ट्यावर आखले जातात. एकदोन दिवसांची पिकनिक ट्रेक, सीसीडी किंवा पिझ्झा हटच्या वा-या, सिनेमा, नाटकं किंवा मग फॅमिलीसोबत थंड हवेच्या ठिकाणी ‘चिल्ड आऊट’ होणं असे एका ना शंभर प्लॅन्स आखले गेले असतील.

पण, सुटीच्या या २-३ महिन्यांत एखादी तात्पुरती नोकरी किंवा अर्धवेळा नोकरी म्हणजेच समर जॉब केला तर? परदेशात हा पर्याय नसून त्यांचं हे नेहमीचं जीवन आहे. परंतु, आपल्याकडे असा पर्याय आपण

ट्राय करू शकतो का, याचा विचार नक्कीच व्हायला हवा. आपल्याकडे आजही मुलांचे शिक्षण ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांनी सुटी कुठल्यातरी पिझ्झा हटमध्ये वेटर म्हणून किंवा एखाद्या संस्थेत कारकून म्हणून काढणं आपल्या भारतीय पालकांना बहुतांशी रूचत नाही. त्याऐवजी मुलांना छंदवर्गांना पाठवणं, देश-परदेशाच्या सहली अरेंज करून देणं असेच प्लॅन्स आखले जातात.

मात्र, अशा छोट्या-छोट्या नोक-यांमधून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. निर्णय घेणं, सर्व स्तरावरील लोकांच्या परिस्थितीची कल्पना येणे आणि मुख्य म्हणजे पैशांची किंमत कळणं यासाठी असे समरजॉब्स
हवेतच.
समर जॉब्जचे करिअरच्या संदर्भातून होणारे फायदे :
वास्तव जगाशी ओळख
नोकरीच्या निमित्ताने कुटुंब आणि मित्रपरिवारापासून लांब
राहून जगाची ओळख होते. सुरक्षित कुटुंबातून बाहेर पडून आपल्यातील उणिवा, दोष यांची थोडीशी ओळखही होण्यास मदत होते. व्यवहाराचंही भान येतं.

भिन्न वयोगटाशी संपर्क
शाळां-कॉलेजांमध्ये असताना मित्र-मैत्रिणी एवढ्यापुरतंच आयुष्य सिमीत असतं. नोकरीच्या निमित्ताने विधिव वयोगटातील लोकांशी डिल कसं करायचं याचं प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं.
सेल्फ अर्निंग
शहरात किंवा शहराबाहेर छोटी नोकरी करण्याचा अनुुभव असेल, तर पैसे कमवण्यासाठी कराव्या लागणा-या कष्टांची जाणीव मुलांना होऊ शकते. तसंच, स्वत:चे पैसे खर्चण्याचं प्लॅनिंगही ही मुलं करू शकतात.
थिअरी टू प्रॅक्टिकल
घरात, कॉलेजमध्ये आपल्याला कसं कमवण्याचं थिअरिटिकल शिक्षण दिलं जातं. मात्र, त्याचा प्रॅक्टिकली उपयोग करता आला तर त्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहू
शकतात.

करिअर निवडीमध्ये मार्गदर्शक
दहावी-बारावीनंतर निवडला जाणारा अभ्यासक्रम बरेचदा मोठ्या माणसांच्या सांगण्यानुसार केलेला असतो. उन्हाळी सुटीत एनजीओज, फिल्म डायकेक्शन, अकाऊंटन्सी, फॅशन इंडस्ट्री, लेखन अशा आणखी विविध ब-याच वाटा सापडू शकतात.
समर जॉब्ज अव्हॅलेबल
असलेली काही क्षेत्रं:
इव्हेंट मॅनेजमेंट, बँका
मार्केटिंग एजन्सीज, मीडिया
फास्टफूड रेस्टॉरंट्स-हॉटेल्स
रिटेल उद्योग (मॉल्स वगैरे)
समर जॉब्ज कसे मिळवाल?
समर जॉब्ज हे २-३ महिन्यांचे म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याने त्याची फार मोठी जाहिरात केली
जात नाही. माग हे जॉब्ज कसे शोधणार?
कॉलेजमधल्या प्लेसमेंट सेल्स, आपल्या नातेवाईकांना, परिचितांना परीक्षांच्या आधी जॉब विषयी सांगून ठेवणं, कॉलेजचे प्राध्यापक यांच्या मदतीने हे जॉब्स मिळवता येतील

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here