करिअरमागे धावताय ?

0
396

ड्ढलेबर ब्युरोने गेल्यावर्षी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार देशात ८.७ टक्के पदवीधर बेरोजगार आहेत. उद्योगांविषयीचे अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडलेले २५ टक्के तरुण बेरोजगार आहेत. आपल्या देशात युवकांची आणि तरुणांची लोकसंख्या सुमारे ६० कोटी आहे. क्षमता असूनही व्यावसायिकांचे कौशल्य समोर येत नसल्याचे चित्र आहे. ब-याच वेळा विद्यार्थी असेच म्हणतात, की चांगली पदवी असूनही चांगली नोकरी मिळत नाही.

परंतु पदवीच्या काळात विद्याथ्र्यांनी गांभीर्याने अध्ययन केलेले नसते, ही वस्तुस्थिती आहे. जर तसा अभ्यास त्याने केला असेल आणि त्याच्याकडे कौशल्य असेल, तर त्याला कुठे ना कुठे नोकरी मिळते. सरकारी आणि खासगी क्षेत्रांत काही उद्योग मोठ्या प्रमाणात पदवीधरांना नोक-या देत आहेत. नोकरीसाठी विद्यार्थी दुस-या शहरांत जातात, त्यावेळी सुरुवातीला त्यांना त्रास होतो. परंतु त्यांनी प्रयत्न करत राहिले पाहिजे.

सहसा पदवी मिळवा आणि मग नोकरीच्या मागे लागा : त्यामुळे नोकरी देणाराही तुम्हाला अधिक कुशल समजू लागतो. शिवाय तुम्हालाही अधिक आत्मविश्वास आलेला असतो, साहजिकच तुम्ही चांगले काम करू शकता. तुम्ही जर पूर्ण तयारीनिशी नोकरी करण्यासाठी आलात, तर तुम्ही अधिक चांगले काम करू शकता.

त्यामुळे तुमचा चांगला प्रभाव मिळतो आणि नोकरीत तुम्ही झटपट पुढे जाऊ शकता. आपली पूर्ण तयारी असली तर त्यामुळे नोकरी देणा-यालाही समाधान वाटते व तो विश्वासाने अधिकाधिक जबाबदा-या सोपवू शकतो.

इंटर्नशिपचा काळ सहजतेने घेऊ नका : या काळात आपल्या उमेदवारांना पारखले आणि जोखले जाते. म्हणून या काळात दांड्या मारणे, अकारण सुट्या घेणे किंवा रजा टाकणे टाळा. तुमच्या प्रतिमेला त्यामुळे तडे जातात. या काळात प्रत्येक काम बारकाईने शिकून घ्या. वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याचा हा काळ असतो.

जी गोष्ट समजली नसेल ती दहा वेळा विचारायला विचारू नका, कारण हाच काळ कामातील तज्ज्ञता मिळवण्याचा असतो. प्रशिक्षकांशी संपर्क ठेवा. त्यांचे फोन नंबर आणि मेल आयडी घेऊन ठेवा. यामुळे नेहमीच अडचणीच्या वेळी भरपूर मदत मिळू शकते.

उत्तम रिझ्युमे बनवा : रिझ्युमेची नोकरी मिळवण्यासाठी खूपच मदत होते. कारण हा प्रेझेंटेशनचा जमाना आहे. त्यामुळे चांगल्या शब्दांत उत्तम रिझ्युमे बनवा. तुमचा संपूर्ण अनुभव, आवडीचे विषय, पात्रता याचा तपशीलवार उल्लेख करा. मात्र अकारण प्रशंसा किंवा खोटी माहिती लिहू नका.

ऑनलाईन क्षेत्रात काम करा : ऑनलाईन क्षेत्रातील कामात हल्ली तुम्ही मोठे वेतन आणि उत्तम काम या दोन्ही गोष्टी मिळवू शकता. सोशल मिडीया मॅनेजर पासून कित्येक चांगल्या पदांवर तुम्ही काम करू शकता. स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आणि निर्मितीमध्ये तुम्ही काम करू शकता. नॅशनल जॉब पोर्टलमधून रोजगाराची माहिती समजू शकते.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here