करिअरमधील ‘ऑक्सिजन’

0
226

विश्वास म्हणजे जगण्यासाठी ऑक्सिजन नंतरची अत्यावश्यक आणि अविबाज्य गरज. उत्तम शिक्षण, चागंली नोकरी, नोकरीमध्ये पार पाडावी लागणारी जबाबादारी हे सारं काही यशस्वीपणे पार पाडायचं असेल तर तुमच्या मनामध्ये विश्वास असायला हवा. काम करण्याची क्षमता असेल पण ती क्षमता वापरण्याचा विश्वास नसेल तर करिअरमध्ये यशाचा मार्ग जास्त खडतर होतो.

विश्वास म्हणजे जगण्यासाठीचा ऑक्सिजन नंतरची अत्यावश्यक आणि अविभाज्य गरज. उत्तम शिक्षण, चांगली नोकरी, नोकरीमध्ये पार पाडावी लागणारी जबाबदारी हे सारं काही यशस्वीपणे पार पाडायचं असेल तर तुमच्या मनामध्ये विश्वास असायला हवा.

अति आत्मविश्वास नको : कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणामध्ये असायला हवी, नाहीतर अति झाले आणि हसू आले अशी परिस्थिती होते. जी गोष्ट आपल्याला समजली आहे, ज्या गोष्टी आपल्याला संपूर्ण माहिती आहे ते काम करताना आपल्या मनामध्ये पूर्ण खात्री हवी. जे करू ते चांगलेच होईल असा विश्वास मनामध्ये असायला हवा.
अर्थात कोणतेही काम स्वाकारताना आपल्याला ते करता येईल का? याचा सारासार विचार करूनच काम स्वीकारले पाहिजे. इंटरव्ह्यू घेताना एखादा वेगळा प्रश्न विचारल्यावर किंवा वेगळा प्रोजेक्ट करणार का असे विचारल्यावर अनेकदा कॅन्डिडेटची गडबड उडते.

कारण त्यांना स्वतःविषयी विश्वास नसतो, जमेल का आपल्याला हे काम अशी शंका त्यांच्या मनामध्ये येते. ‘एच.आर.’ च्या दृष्टीने हा पॉर्इंट निगेटिव्ह म्हणून नोंदला जातो. म्हणूनच इंटरव्ह्यू असो किंवा एखादी परीक्षा तुमची तयारी मनापासून करायला हवी. होमवर्क चांगलं असेल तर तुम्ही विश्वासाने कामाला सामोरे जाता.

परफेक्ट तयारी : एखादे काम चांगलं होण्यासाठी परफेक्ट पूर्वतयारी असायला हवी. काम करताना कोणत्या गोष्टीची गरज लागणार आहे, कोणत्या अडचणी येऊ शकतात, समजा अडचणी आल्याच, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी काय तयारी असायला हवी, काम पूर्ण होण्यासाठी काही इतर पर्याय आहे का? या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवायला हवी.

खात्री ठेवा : काम करताना आपण एकटेच असतो किंवा आपल्याला ग्रुपमध्ये काम करायचे असो, मनामध्ये आपले काम चांगलेच होणार याची खात्री असायला हवी.

ग्रुपमध्ये काम करताना अनेक प्रकारच्या लोकांसोबत आपल्याला काम करावे लागते. प्रत्येकाचा स्वभाव, कामाची पद्धत वेगवेगळी असते. हे सगळं सांभाळत काम करणे गरजेचे असते.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here