नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये

0
254

कामाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. त्यामुळे आज महत्त्वाची स्किल्स काही दिवसांनी उपयोगी पडतीलच, असे नाही. तेव्हा आपल्या क्षेत्राबद्दल अपडेट राहणे, त्यात काय बदल होत आहेत, नवीन काय स्किल्स लागू शकतात, याची नोंद ठेवली आणि ती मिळवण्याचा प्रयत्न केला,

तर कोणत्याही आर्थिक वातावरणात नोकरी मिळणे सोपे होते.

* कम्युनिकेशन : ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारांची लोक एकत्र येतात. त्यांच्याबरोबर काम करणे, जुळवून घेणे हे टीमच्या आणि कंपनीच्या फायद्याचे असते. आपण बोलून, लिहून आणि बॉडी-लँग्वेजमधून संवाद साधतो. स्वत:च्या भावनांवर ताबा ठेवणे फायद्याचे ठरते.

* नवीन शिकण्याची इच्छा : जग बदलत असताना कंपनीलादेखील नवनवीन कौशल्ये मिळवणा-यांची गरज असते. काही दिवस नोकरी झाल्यावर आपल्याला सगळे येते आहे, असा अनेकांचा भ्रम होतो; पण कामात प्रॉडक्टिव्हीटी नसेल, नवीन स्किल्स शिकण्याची इच्छा नसेल, अशांनी दुसरीकडे नोकरी शोधणे चांगले.

ज्यांना शिकण्याची इच्छा असते, ते प्रश्न विचारतात, त्यांना जाणून घेण्यात, अपडेट राहण्यात इंटरेस्ट असतो आणि तो त्यांच्या वागण्यातूनही दिसतो.

* स्वत:बद्दलची माहित : आयुष्यात तुम्हाला स्वत:विषयीची योग्य जामीव नसेल किंवा पुढे काय करायचे आहे, याची माहिती नसेल, तर कंपनीलाही ते कळणे अवघड होते. स्वत:ची हुशारी, सामथ्र्याविषयी जेवढी नीट माहिती तुम्हाला असेल आणि तुम्हाला स्वत:बद्दल आदर असेल, तरच समोरचा तुमचा योग्य आदर राखून तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पोहोचवण्यास मत करू शकतो.

* इतरांबरोबर मिसळून वागणे : कुठल्याही कंपनीत आपला अनेकविध प्रकारच्या, स्वभावाच्या लोकांशी संबंध येतो. तेव्हा तुम्हाला इतरांबरोबर नीट जुळवून काम करता येणे अपेक्षित असते. कारण, भांडखोर, अढ्यतखोर स्वभावाच्या लोकांमुळे इतरांच्याही कामावर परिणाम होतो आणि हे कोणत्याही कंपनीला परवडणारे नसते.

यामध्ये कामावर केली गेलेली टीका सकारात्मक घेऊन आपल्या वर्तनात बदल घडवण्याची क्षमता असावी लागते. अन्यथा, आपल्या चुकांबद्दल कारणे किंवा इतरांना दोष देणा-यांना आपली प्रगती का होत नाही, हा प्रश्न पडू शकतो.

* जबाबदारीने काम करण्याची क्षमता : आपण आपल्या कामाविषयी जबाबदार आहोत, याची जाणीव असणे आवश्यक असते. कॉलेजच्या केअर-फ्री वातावरणातून एकदम अंगावर कामे येऊ लागली की काम टाळणे, जमत नाही या सबबीखाली सहका-यांना कामाला लावणे, लहान-सहान प्रत्येक निर्णयासाठी इतरांवर अवलंबून राहणे, अशा गोष्टी होऊ लागतात. कातडी बचाव धोरण काही दिवस सफल झाले,

तरी ते बाकीच्यांच्या नजरेत भरायला वेळ लागत नाही. तेव्हा आपल्याला दिलेले काम आपल्या योग्यतेनुसार वेळेत पार पाडण्याची क्षमता असणा-यांची एम्प्लॉयबिलिटी जास्त असते. आपले काम पार पाडताना इतरांचा आदर ठेवण्याचीही गरज असते.

* क्रिएटिव्ह आणि चिकत्सक विचार : आपले काम कसे जास्त चांगले करता येईल, तसेच काम करताना आपल्या व्यतिरिक्त व्यक्तींचा दृष्टिकोन समजून घेता येणे, त्याचप्रमाणे फॅक्ट आणि ओपिनियन यामधला फरक जाणून घेण्याची क्षमता तुम्हाला यशस्वी करू शकते.

* प्रेशरखाली काम करणे : आजकाल सगळ्याच प्रकारच्या व्यवसायात कामाचे प्रेशर खूप असते. त्यामुळे तणावाखाली नीट सकारात्मक काम करता येणे, हे तुमच्या आणि कंपनीच्या दृष्टीने फायद्याचे असते.

* फ्लेक्सिबिलिटी : काही व्यवसायात, कामाचे तास, कामाचे स्वरूप बदलू शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे काम करता येणे, कधी कामासाठी जास्त थांबणे वा शिफ्टमध्ये काम करणे अपेक्षित असते. या सगळ्यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणीही बघत नसतानाही सच्चाईने योग्य काम करण्याची क्षमता.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here