MPSC Mains Exam 2021 एमपीएससी मुख्य परीक्षेची प्रवेशपत्रे जाहीर

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी करण्यात आले आहे. ही परीक्षा येत्या २० नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी एमपीएससीचं अधिकृत संकेतस्थळ mpsconline.gov.in वर जाऊन ही प्रवेशपत्रं डाऊनलोड करायवीत.

UPSC ESE Exam 2022: यूपीएससी ईएसई परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम समजून घ्या(Opens in a new browser tab)

उमेदवारांना आयोगाने कळवले आहे की परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. अन्यथा परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.


परीक्षेदिवशी पेपरच्या वेळेच्या किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आवाहनही आयोगाने केले आहे. तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

The Indian Express संपादकीय

कोविड – १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.

The Indian Express संपादकीय (नोव्हेंबर ११, २०२१)(Opens in a new browser tab)

अॅडमिट कार्ड मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास आयोगाच्या contact-secretary@mpsc.com आणि support-online@mpsc..gov..in या ईमेलवर किवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावर विहित वेळेत संपर्क साधावा.

 

 

 

Source link