महत्त्व स्वसंवादाचे

0
192

आपण विचार करतो म्हणजे स्वतःशी बोलत असतो. यालाच स्व-संवाद म्हणता येईल. अखंड चालू असणा-या या स्व-संवादामध्ये वक्ता आणि श्रोता दोन्ही भूमिका स्वतःच निभावत असतो. एकूणच स्व-संवाद हा आपल्या आयुष्याचा अत्यंत अविभाज्य घटक आहे, असे म्हणता येईल.

अनुरूप किंवा योग्य विचारांची निर्मिती हा संतुलित व्यक्तिमत्त्वाचा पाया आहे. माणसे आणि प्रसंग बघून योग्य पद्धतीने वागता येणे ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे, असे म्हणता येईल; पण फार कमी वेळा आपल्याला हे साध्य होते. यामागे आपले महत्त्वाचा ठरतो तो ‘स्व-संवाद’ .

आपण विचार करतो म्हणजेच मनातल्या मनात स्वतःशी बोलत असतो. स्वतःच स्वतःशी बोलणे याला स्व-संवाद म्हणता येईल. हा स्व-संवाद अखंड चालू असतो. आपण इतरांशी बोलतानाही स्वतःशी सतत संवाद करत असतो. आपण एकटे असताना हा स्व-संवाद जास्त प्रमाणात होऊ शकतो.

या स्व-संवादामध्ये आपल्या आयुष्यात भूतकाळात किंवा वर्तमानकाळात घडलेल्या अनेक प्रसंग, घटना यांचा समावेश असतो. तसेच भविष्यात घडणा-या गोष्टींविषयी उत्सुकता, काळजी वैगरे गोष्टींचा समावेश होतो. स्व-संवादामध्ये वक्ता आणि श्रोता दोन्ही भूमिका स्वतःच निभावत असतो.

एकूणच स्व-संवाद हा आपल्या आयुष्याचा अत्यंत अविभाज्य घटक आहे असे म्हणता येईल.
सकारात्मक स्व-संवाद : स्व-संवाद सकारात्मक असेल तर आपण नेहमीच आशावादी राहतो. उत्साही राहतो. यामुळे रोजच्या आयुष्यामध्ये आपण उत्तम कार्यरत राहण्यास मदत होते.

रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक अडचणी आपल्या समोर येतात. अशा वेळी स्व-संवाद सकारात्मक असेल तर परिस्थिती मार्ग काढणे सोपे जाते.

आपण अनेक वेळा निराश किंवा दुःखी होतो. अशा वेळी ‘मला हे नक्की जमणार नाही’ या विचारापेक्षा ‘मी हे करून बघतो’ , ‘मला हे नक्की जमेल’ अशी सकारात्मक स्व-संवाद वाक्य आपल्याला हुरूप देतात, आत्मविश्वास देतात.
सकारात्मक स्व-संवादामुळे यश मिळण्याची शक्यता नेहमीच वाटते. स्पर्धात्मक परीक्षा किंवा खेळामध्ये आपण सकारात्मक स्व-संवादाचा उत्तम फायदा करून घेऊ शकतो.

आत्मविश्वास वाढवणारी काही सकारात्मक स्व-संवादाची वाक्ये…
१) मी समोरील आव्हान पेलण्यास नक्कीच समर्थ आहे. त्यासाठी लागणारी शक्ती, उत्साह, चैतन्य माझ्याजवळ आहे.
२) माझ्यातील क्षमता आणि कमतरता याची मला योग्य जाणीव आहे.
३) मी यशस्वी होण्यास नक्कीच लायक आहे.
४) माझ्यातील गुणवैशिष्ट्यांसह मी नक्कीच वेगळा आहे. ज्या गोष्टींवर माझे नियंत्रण नाही, त्या गोष्टींचा मी मनोमन

स्वीकार करणार आहे.
नकारात्मक स्व-संवाद…
नकारात्मक स्व-संवाद तुम्हाला ध्येयप्राप्तीपासून नेहमीच दूर नेतो. या स्व-संवादामुळे तुमच्या मनामध्ये भिती, निराश, दुःख अशा विरूप भावनांची निर्मिती होते. नकारात्मक स्व-संवादामुळे स्वतःच्या क्षमता, गुण, कौशल्ये याविषयी साशंकता निर्माण होते. वारंवार अपयश येण्याची भिती वाटते.ताणतणावाची निर्मिती होते आणि मानसिक आरोग्य नीट राहात नाही. परिणामी, आपली अपेक्षित प्रगती होऊ शकत नाही.

नकारात्मक स्व-संवादामुळे येणा-या परिस्थितीला नेहमीच शरण जावे लागते. अडचणीच्या परिस्थितीमधून मार्ग काढणे जमत नाही. वैचारिक गोंधळालाही सामोरे जावे लागते. अस्वस्थता वाढण्यास नकारात्मक स्व-संवादाची मदत होते.
आत्मविश्वास कमी करणारी नकारात्मक स्व-संवादाची काही वाक्ये…..

१)) माझे ध्येय साध्य करण्यास मी असमर्थ आहे.
२) माझ्यापेक्षा इतरजण अधिक सरस आहेत.
३) माझे नशीब माझ्या विरूद्धच आहे. मी कमनशिबी आहे.
४) घवघवीत यश मिळवण्याची माझी कुवतच नाही.
५))मी कायम हरत आलो आहे. आजही मी हरणार आहे.
६) समाजातील इतर लोक माझ्यापेक्षा जास्त यशस्वी आहेत.
७) मी हरण्यापेक्षा परिस्थिती पाहून माघार घेणेच जास्त योग्य आणि श्रेयस्कर आहे.

आपण आपल्याशी उत्तम स्व-संवाद साधूया. आपला स्व-संवाद सकारात्मक आहे, की नकारात्मक आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. नकारात्मक स्व-संवाद असेल तर त्याचे रुपांतर आपण सकारात्मक स्व-संवादामध्ये करण्याचा निश्चय करूया.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here