सामान्य विज्ञानाची तयारी

0
297
general science
general science

या लेखामध्ये आपण नागरी सेवा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण, परंतु इतर अभ्यासघटकांच्या तुलनेत विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित

 

या लेखामध्ये आपण नागरी सेवा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण, परंतु इतर अभ्यासघटकांच्या तुलनेत विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या ‘जनरल सायन्स’ या अभ्यासघटकाची तयारी कशी करावी याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये हा अभ्यासघटक फक्त दोन शब्दांमध्ये नमूद केलेला असला तरी वास्तविक स्वरूपामध्ये त्याची व्याप्ती फार मोठी आहे.

कारण यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, कृषिशास्त्र, जैवतंत्रज्ञान, अवकाश संशोधन जेनेटिक्स, नॅनो तंत्रज्ञान, दूरसंचार तंत्रज्ञान इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे. हा अभ्यासघटक वैविध्यपूर्ण असल्याने विज्ञान शाखेची पाश्र्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक शाखेच्या विद्यार्थ्यांमध्येही या अभ्यासघटकाच्या तयारीविषयी संभ्रमावस्था दिसते.

मानवी जीवनामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे व पुढेही विज्ञान व तंत्रज्ञान याचे महत्त्व अनन्यसाधारण असेल. त्याचबरोबर अर्थशास्त्राप्रमाणेच विज्ञान व तंत्रज्ञान हेसुद्धा सामाजिक बदलाचे साधन असल्याने नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व आणि मुख्य या दोन्ही पातळीवर यूपीएससीकडून या अभ्यासघटकावर नेहमीच भर दिला गेला आहे. २०११ पासूनच्या प्रश्नपत्रिकांमध्ये सुमारे १० ते ३२ प्रश्न आलेले आहेत.

या अभ्यासघटकावर येणारे प्रश्न मूलत: विज्ञानाच्या सर्वसाधारण आकलनावर आधारित असतात. यामध्ये रोजच्या जीवनामध्ये येणारे अनुभव, निरीक्षणे यावर आधारित प्रश्न येतात. उदा. २०११ मध्ये मिठाचे स्फटिकीकरण, बर्फ वितळणे, दूध आंबणे यांमधील रासायनिक परिवर्तनाचे उदाहरण कोणते? त्याचबरोबर वटवाघूळ, अस्वल व कुरतडणारे प्राणी यापकी कोणत्या प्राण्यामध्ये शीतनिष्क्रियता (Hibernation) आढळते. याबरोबरच वाय-फाय व ब्लू-टूथ तंत्रज्ञान यातील फरक असे रोजच्या वापरातील तंत्रज्ञानाविषयीचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात.

या बरोबरच जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या पारंपरिक घटकांबरोबरच त्यांचा व्यवहारातील वापर नवीन तंत्रज्ञान, शोध यावर आधारित प्रश्न येतात. २०१० पूर्वी या अभ्यासघटकावर विचारले गेलेले प्रश्न पारंपरिक स्वरूपाचे म्हणजेच विषयाशी निगडित होते. सध्या प्रश्नांमध्ये पारंपरिक घटक व चालू घडामोडी यांचे मिश्रण दिसते. यूपीएससीचे गतिशील स्वरूप पाहता या अभ्यासघटकावरील चालू घडामोडी व तंत्रज्ञानविषयक बाबींचा प्रभाव अधिक असला तरी विज्ञानातील पारंपरिक घटकांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.

कारण २०१४ च्या प्रश्नपत्रिकेमध्ये लायकेन (Lichens) वरचा प्रश्न, प्रकाश संश्लेषणावरचा प्रश्न, त्याचबरोबर वनस्पतींचे शाकीय प्रजनन (Vegetative Propogation) इ. प्रश्न विज्ञानातील पारंपरिक घटकांचे महत्त्व अधोरेखित करतात. यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केल्यानंतर सर्वप्रथम विज्ञानातील मूलभूत संकल्पना जाणून घेणे श्रेयस्कर ठरेल.
उमेदवारांनी सर्वप्रथम या अभ्यासघटकाच्या तयारीविषयीची संभ्रमावस्था काढून टाकण्याची आवश्यकता आहे. कारण या अभ्यासघटकावर येणाऱ्या प्रश्नांमधून प्रामुख्याने विद्यार्थ्यांची या क्षेत्राविषयीची जागरूकता तपासली जाते. परिणामी, या अभ्यासघटकावर प्रभुत्व मिळविण्यासाठी कुठल्याही विशेष ज्ञानाची आवश्यकता नसते.

या प्रकारचे प्रश्न कुठलीही सुशिक्षित व्यक्ती विज्ञान शाखेची पाश्र्वभूमी नसतानाही सोडवू शकते. याकरिता विद्यार्थ्यांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे क्रमप्राप्त आहे. यानंतर एनसीईआरटीच्या सहावी ते दहावीच्या क्रमिक पुस्तकांपासून तयारी करणे उचित ठरेल. कारण या पुस्तकांमधून या विषयातील सर्व मूलभूत संकल्पना स्पष्ट होतात. त्याचबरोबर परीक्षेत येणारे बहुसंख्य प्रश्न याच पुस्तकावर आधारित असतात. यामुळे ही पुस्तके विज्ञान व कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सारखीच महत्त्वपूर्ण ठरतात.
‘एनसीईआरटी’ पुस्तकांच्या अध्ययनानंतर मूल्यवर्धनाकरिता ‘इंडिया इयर बुक’मधील ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ हे प्रकरण अभ्यासावे. यातून विज्ञानाशी संबंधित धोरणे, संस्था, कार्यक्रम यांची माहिती मिळते. त्याचबरोबर ‘द िहदू’ या वृत्तपत्रातील एस अँड टी हे पान काळजीपूर्वक वाचून त्यातून नोट्स काढणे अत्यावश्यक आहे. यामधून या क्षेत्रातील संशोधन, नवे तंत्रज्ञान, रोग याविषयी माहिती मिळते

. या वर्षांमध्ये इबोला, स्वाइन फ्लू इ. रोग व हबल दुर्बणिीची २५ वष्रे, थ्री-डी िपट्रिंग तंत्रज्ञान, नरेंद्र मोदी यांनी प्रचारामध्ये वापरलेले थ्री-डी होलोग्राम तंत्रज्ञान, ‘११७’ या नवीन रासायनिक मूलद्रव्याचा शोध, नवीन पेंटावॅलंट लस आदी घडमोडी चच्रेत होत्या, त्यांच्याविषयीची माहिती वृत्तपत्र व इंटरनेटच्या माध्यमातून प्राप्त करावी.

‘सायन्स रिपोर्टर’, ‘डाउन टू अर्थ’ इ. मासिकांचे नियमितपणे वाचन करून परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींची नोंद करून ठेवावी. याशिवाय पी.आय.बी. आणि तत्सम विज्ञानविषयक संकेतस्थळांना भेट दिल्यास या विषयाची तयारी अधिक परिणामकारक होऊ शकते. मानवी शरीराशी संबंधित माहितीकरिता ‘ह्युमन मशीन’ हे पुस्तक फायदेशीर ठरते.
‘जनरल सायन्स’ या अभ्यासघटकाचे विस्तृत स्वरूप पाहता यातील काही घटकांचे प्राधान्यक्रमाने अध्ययन करणे सयुक्तिक ठरेल.

यामध्ये भौतिकशास्त्रातील विविध नियम, सिद्धांत उदा. न्यूटनचे नियम, ऑप्टिक्स, ध्वनी, चुंबकत्व, विद्युत, घनता, पृष्ठभागीय ताण इ. मूलभूत संकल्पनांच्या बरोबरीने रोजच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या डीटीएच, ओव्हन, रडार, लेसर, थर्मोमीटर, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर आदी उपकरणांमागील संकल्पना व तत्त्वे जाणून घेणे आवश्यक आहे. उदा. २०११ मध्ये ब्ल्यू रे डिस्क व डीव्हीडी यातील फरक सांगा, त्याचबरोबर तळ्याचा पृष्ठभाग अतितीव्र हिवाळ्यामध्ये गोठतो, पण तळाचे पाणी गोठत नाही, याचे कारण काय? अशा स्वरूपाचे भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना तपासणारे प्रश्न येतात.

जीवशास्त्रामध्ये मानवी शरीरातील पचनसंस्था, प्रजननसंस्था इ. पेशींचे प्रकार, वनस्पतीचे वर्गीकरण, जीवनशास्त्राच्या शाखा, जनुके, जनुकीय अभियांत्रिकी, बायोटेक्नॉलॉजी, जीवनसत्त्वे व त्यांच्याअभावी होणारे रोग, स्टेम सेल्स इ. घटक महत्त्वपूर्ण आहेत. रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाची रासायनिक संयुगे, खनिजे व त्यांचा आढळ, धातू व त्यांचे गुणधर्म, कार्बन व त्याची संयुगे, ऑक्सिडेशन व रिडक्शन क्रिया व त्यांची उदाहरणे, रोजच्या जीवनामध्ये रसायनशास्त्राचा होणारा वापर यांचा अभ्यास करावा.

याबरोबरच नॅनो तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण इ. तंत्रज्ञानविषयक बाबींची माहिती करून घ्यावी.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here