मुलाखतीला जाताना…

0
426

एखाद्या जॉबसाठी तुम्ही पाठविलेला रेझ्युमे सिलेक्ट झाला की, इंटरव्ह्यूचा कॉल येतो. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी प्रत्यक्ष जाण्यापूर्वी तुमच्या रेझ्युमेनं तुमची आळख करून दिलेली असते. मग रेझ्युमेमध्ये नमूद केलेल्या गोष्टी आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही प्रत्यक्ष सांगितलेल्या गोष्टी यामध्ये तफावत असेल तर मुलाखतकत्र्यावर तुम्ही छाप पाडू शकणार नाही.

पहिली पायरी तुमच्या रेझ्युमेने चढून दिल्यावर इंटरव्ह्यूमध्ये पुढची पायरी सर करण्याची प्रत्यक्ष जबाबदारी तुमच्यावर असते. यासाठी पुढील बाबींची काळजी घ्यावी
ङ्घरेझ्युमे स्वत: तयार करा

स्टँडर्ड फॉरमॅट कॉपी केला तरी चालेल, मात्र संपूर्ण रेझ्युमे दुस-याकडून बनवून घेऊ नका. तुम्हाला हायलाईट करायच्या गोष्टी तुम्हीच ठरवा. दुस-या कुणाचा रेझ्युमे कॉपी करताना त्याची जन्मतारीख किंवा क्वालिफिकेशन लिहिल्याचे मी पाहिले आहे.

एचआरच्या जॉबसाठी आलेल्या उमेदवाराच्या सीव्हीमध्ये परीक्षेतले माक्र्स ७८ ऐवजी ७८०, तर क्वालिटीसाठीच्या उमेदवाराच्या रेझ्युमेमध्ये भरपूर स्पेलिंग मिस्टेक्स असे प्रकार आढळून येतात. या छोट्या छोट्या गोष्टी फार नुकसान करून जातात. इंटरव्ह्यूला जाताना रेझ्युमेवर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत हे लक्षात ठेवा.
ङ्घप्रोजेक्टची माहिती द्या

तुम्ही फ्रेशर असाल व पहिल्याच नोकरीसाठी अर्ज करत असाल तर, तुम्ही कॉलेजमध्ये केलेले प्रोजेक्ट वर्क हाच तुमचा जॉब होता असे समजा. एकूण प्रोजेक्टमध्ये तुमचा रोल कसा होता, प्रोजेक्टमध्ये तुमचं व्यक्तिगत योगदान काय, प्रोजेक्ट यशस्वी किंवा अयशस्वी होण्याची कारणं काय,

असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कदाचित तुम्ही कॉलेजमध्ये केलेल्या प्रोजेक्टची व्याप्ती इंडस्ट्रीतल्या बेस्ट प्रॅक्टिसपेक्षा मोठी असू शकेल. तेव्हा, मला कामाचा अनुभव नाही, सं न संमजता, केलेल्या कामाचा होम-वर्क नीट करून इंटरव्ह्यूला सामोरे जा.

ङ्घतुम्ही अनुभवी उमेदवार असाल तर, तुमच्या अनुभवाइतकीच तुम्ही काम केलेल्या कंपनीची माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे. कंपनीतल्या सिस्टीम वा सर्टिफिकेशनची अधिक महिती घ्या. त्या कंपनीतील तुमच्या कामाचे स्वरूप काय होते, तुमच्या सध्याच्या कंपनीला आयएसओ मिळालं असल्यास ते मिळविण्यास तुमचा रोल काय होता, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुमच्या जॉब डिस्क्रीप्शननुसार तुम्ही कोणती जबाबदारी पेलली, कंपनीत सिक्स सिग्मा प्रणाली होती असं तुम्ही म्हटलत तर त्यात तुमचा रोल काय होता, सिक्स सिग्मानुसार तुमच्या कोणत्या आयडिया वापरण्यात आल्या अशा प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा.

ङ्घताज्या घडामोडींवर लक्ष ठेवा
तुम्ही फ्रेशर किंवा अनुभवी असलात तरी, ज्या कंपनीत इंरव्ह्यू द्यायचा आहे त्या इंडस्ट्रीमधील ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवा. वर्तमानपत्र, मॅगेझिन्स, इंटरनेटच्या माध्यमातून इंडस्ट्रीतील लेटेस्ट ट्रेंड्स, सरकारी धोरणे, समस्या, भविष्यातील संधी यावर लक्ष ठेवा.

उदा. बीपीओ इंडस्ट्रीची एम्प्लॉयी अ‍ॅट्रीशन ही एक समस्या आहे. एखाद्या बीपीओमध्ये एच आरसाठी इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर तुम्हाला हमखास हे प्रश्न विचारे जातील- एम्प्लॉयी टिकविण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करु शकता, आधीच्या जॉबमध्ये या प्रश्नासाठी काही केले असल्यास तुम्ही तपशील व आकडेवारी देऊ शकाल का किंवा ऑटोमोबाईल वा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीची एक सर्वसाधारण समस्या म्हणजे एफिशियन्सी लॉस, किंवा अपेक्षित कार्यक्षमतेहून कमी

उत्पादन, प्रॉडक्शन डिपार्टमेंट मध्ये इंटरव्ह्यूला जाताना या सर्वसाधारण समस्येवर तुम्ही केलेल्या किंवा करता येईल अशा उपायांबाबत पूरेपूर तयारी करा.

ङ्घआत्मविश्वासाने बोला
मॅनपॉवर प्लॅनिंग व मॅनपॉवर हॅन्डलिंग कसं करायचं, हा प्रॉडक्शन सुपरवायझर ते प्रॉडक्शन हेडपर्यंत सर्वांना विचारला जाणारा प्रश्न आहे. यावर, इंडस्ट्रीमध्ये कुठं काय चालू आहे, बेस्ट प्रॅक्टीसेस कोणत्या, तुमच्या अनुभवातून आलेले मार्ग कोणते, याबद्दल आत्मविश्वासाने बोलता आले पाहिजे.

ङ्घतुम्ही फ्रेशर असा अथवा अनुभवी नव्या कंपनीत तिथल्या पद्धती, तंत्रज्ञान, माणसं हे सर्व तुमच्यासाठी अपरिचित असतं. तुमचा अनुभव त्याच फील्डमधला असला तरी इंटरव्ह्यू घेणा-या व्यक्तीला हे ठाऊक असते की, अगदी तंतोतंत आपल्या पद्धतीने काम केलेला उमेदवार मिळणे अवघड आहे. तुमच्या रेझ्युमे व इंटरव्ह्यूमधून समोरची व्यक्ती प्रयत्न करत असते.

ङ्घदोन गोष्टी जुळवायच्या, एक कंपनीची गरज आणि दोन, तुमचं ज्ञान, कौशल्य, अनुभव काही ठराविक प्रश्नांतून तुम्ही हे नियोजित काम करू शकता असा विश्वास मुलाखतकत्र्याला वाटला की, तुमचा त्या जॉबमधील प्रवेश सोपा होईल.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here