करिअरमधील यशासाठी…

0
257

खरं तर निवडलेला अभ्यासक्रम मिळणारी नोकरी लागली की निवृत्त होईपर्यंत काळजी नाही, अशी स्थितीही सध्या राहिलेली नाही. त्यामुळे कोणत्या क्षेत्रात करिअर करावं या विषयी विद्यार्थी वर्ग संभ्रमित तर जॉब मिळवणं, तो टिकवून ठेवण्यासाठी काय करावं या विचारात नोकरी करणारी मंडळी व्यग्र असतात.

सतत बदलत जाणारे नवनवीन तंत्रज्ञान, आपल्या देशाची बदलणारी आर्थिक धोरणे इत्याचे आपल्या करियरवर बरेवाईट परिणाम होत असतात.

त्यामुळं आपल्या करियरची योग्य निवड, नियोजन आणि नियंत्रण करायला शिकणं खूप आवश्यक आहे. पारंपरिक पदवी आणि तदनुषंगिक ठराविक चाकोरीतील नोकरी हे दृश्य जवळपास अस्तंगत होत चाललेलं आहे.

एकदा नोकरी मिळाली की निवृत्त होईपर्यंत ठराविक स्केलमधील पगारवाढ घेत राहण म्हणजे नोकरी करणं तर नोकरी मिळाल्यानंतर त्या नोकरीतील सर्वोत्तम संधी लवकरच मिळवणं, त्यासाठी योग्य ते ध्येय ठरवणं, स्तव:ला घडवणं, आत्मविश्वास वाढवणं या सगळ्या गोष्टींचा एकत्रित प्रभावी वापर करता येणंम म्हणजेच करिअर करणं असं ढोबळमानानं आपल्याला म्हणता येतं.

आपण नोकरी स्वीकारल्यानंतर आपल्या करियरचा पाठपुरावा करायला लागतो. जसजसा आपला अनुभव वाढत जातो तशा करियरपासून असलेल्या आपल्याला अपेक्षाही बदलत जातात.

आपण करत असलेले करिअर खरं तर ट्रेझर हंट या खेळासारखेज असते. ट्रेझर हंट या खेळात इच्छाशक्ती, प्रसगावधन, चपळाई आणि आपल्या टीमबरोबरचा मैत्रीपूर्ण वावर यांची गरज असते.

आपण करियरमध्ये ठरवलेलं आपलं ध्येय म्हणजे खजिना, ते ध्येय गाठण्यासाठी नुसतं त्या दिशेनं पळत सुटणं चुकीचं आहे, तर ते ध्येय प्राप्त करण्यासाठी बुद्धीचा वापर, आपल्यातील सामथ्र्याचा वापर करून योग्य दिशा ठरवून केलेले सूत्रबद्ध प्रयत्न आपल्याला यशाच्या पाय-यांची दिशा दाखवतात.

आपण जेव्हा दूरच्या प्रवासाला निघतो तेव्हा जर आपल्याकडं गरजेचं सामान असेल तर आपल्याला मोळकळेपणानं प्रवासाचा आनंद घेता येतो, तद्वत कामाच्या ठिकाणी आनंद घ्यायचा असेल तर तेथील नकोशा आठवणी,

कोणी दिलेला त्रास, आपणच कळत नकळत केलेल्या चुका, या टाकाऊ आणि निरर्थक आहेत हे लक्षात घेऊन त्या विसरून जाणं केव्हाही श्रेयस्कर ठरतं. आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या संदर्भातील पूर्ण नियोजन करून त्यात येऊ शकणा-या संभाव्य अडचणी आणि अडथळ्यांच्या योग्य व्यवस्थापनाच्या साह्याने समन्वय साधण्यास शिकणं म्हणजेच आपल्या करिअरचं योग्य नियंत्रण करणं असं आपल्याला म्हणता

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here