करिअरमधील उद्दिष्टपूर्तीसाठी…

0
231

करिअरबाबतची आपली अनेक स्वप्ने वेगवेगळ्या कारणांमुळे साकार होऊ शकत नाहीत. म्हणूनच आपले ध्येय गाठण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. कष्ट करण्याची आणि एकाग्रतेने काम करण्याची तयारी असेल तर तुम्ही करिअरमध्ये ठेवलेले उद्दिष्ट नक्कीच साध्य करू शकता.

यशस्वी करिअर करण्यासाठी आपल्या मनात जबरदस्त इच्छाशक्ती हवी. मनापासून आवड असणा-या क्षेत्रात करिअर केले तर तुमची वाट कोणीच अडवू शकत नाही. म्हणूनच सर्वप्रथम आपल्याला कोणत्या कामात रूची आहे, आवड आहे हे शोधून काढावे लागते. यासाठी समुपदेशकांचीही मदत घेता येईल.

एखाद्या क्षेत्रात करिअर करताना आपल्या आजूबाजूला काय घडते आहे, कोणत्या गोष्टी चालू आहेत, यापैकी कोणत्या गोष्टीचा आपल्याला उपोयग होऊ शकतो याचीही माहिती आपण घेणे आवश्यक असते.

समजा तुम्ही अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहात, तर अभियांत्रिकीच्या शिक्षणाला आणखी कोणत्या तांत्रिक अभ्यासक्रमाची जोड दिली तर आपल्याला उत्तम पगाराची नोकरी मिळू शकते किंवा आपण उद्योगधंदा सुरू करू शकतो. इंटरनेटमुळे आता अशा प्रकारची माहिती मिळवणे अत्यंत सोपे झाले आहे.

करिअरचे नियोजन करताना आपली आर्थिक स्थिती विचारात घेणे अत्यंत आवश्यक असते. आर्थिक स्थितीवरच कोणते शिक्षण घ्यायचे हे अवलंबून असते.

चांगले करिअर करण्यासाठी आपल्याकडे नेतृत्व गुण असणे अत्यंत गरजेचे असते. तुमच्याकडे नेतृत्व गुण असतील तर तुम्ही अनेकांना मार्गदर्शन करू शकता. त्याचा फायदा तुम्हाला अनेक मार्गाने होऊ शकतो.

नोकरी अथवा व्यवसाय करताना तुम्हाला लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची कला अवगत असली पाहिजे. चार लोकांना संभाळून घेऊन त्यांच्याकडून गोडी गुलाबीने व्यवस्थित काम करून घेण्याची कला तुम्ही प्राप्त केली तर उद्योग, व्यवसायाबरोबरच आपण नोकरी करतानाही मोठे यश मिळवू शकतो.

कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना आपण एकट्याच्या बळावर उद्दिष्ट गाठू शकत नसतो, हे लक्षात ठेवा. एखाद्या संस्थेतील एखाद्या व्यक्तीलाच प्रसिद्धी मिळत असली तरी त्यामागे त्याच्या सहका-याच्या संघाचे परिश्रम असतात, ही गोष्ट विसरून चालत नाही. त्यामुळे व्यवसाय अथवा नोकरीमध्ये एकट्याला यश मिळवता येत नाही.

आपल्या मनातील योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सक्षम सहकारी, मित्र हवे असतात. त्याबरोबरच उद्दिष्ट प्राप्तीच्या मार्गात अनेकांचे सल्ले घेणेही गरजेचे असते. आपल्यालाच सर्वकाही ठाऊक आहे, त्यामुळे अन्य लोकांना विचारण्याची गरजन नाही असा अहंभाव ठेवणे उपयुक्त ठरत नाही.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here