पहिल्यांदाच इंटरव्ह्यू देताय ?

0
416

शिक्षण तर संपले, मग पुढे काय? नोकरी… नोकरीसाठी आवश्यक अ‍ॅकेडमिक स्किल्सबरोबर तुमच्यामध्ये आत्मविश्वासही असणे तितकेच आवश्यक आहे. कारण तो नसेल ‘इंटरव्ह्यू’ चा पहिला टप्पा पार करताना आपली अडचण होऊ शकते. ‘इंटरव्ह्यूचा’ हा डिफिकल्ट टास्क पूर्ण करण्यासाठी या काही सिंपल टीप्स..

कॉलेजच्या ईयरच्या दुस-या सेमिस्टरमध्ये गेल्यावर चर्चा सुरू होते ती कॅम्पस इंटरव्ह्यूची. इंटरव्ह्यू कसा होईल? त्यात काय प्रश्न विचारतील, मी सिलेक्ट होईन की नाही? मी नेमकं कस बोलायला हवं इंटरव्ह्यू देताना? असे विविध प्रश्न डोक्यात गर्दी करायला लागतात.

आणि एकदम जाणवतं की अरे आपल्याला इंटरव्ह्यूचं खूपच टेन्शन आलयं अर्थात इंटरव्ह्यूचं खूपच टेन्शन आलयं अर्थात इंटरव्ह््यू देताना प्रत्येकाला टेन्शन हे येतचं, पण पहिल्यांदाच इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर ही टेन्शन लेव्हल भलतीच हाय असते.

फ् मित्रांनो, इंटरव्ह्यूसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो तुमचा आत्मविश्वास, इंटरव्ह्यूला जाताना तुमचा आत्मविश्वास तुमच्या देहभोलीतून (बॉडीलँग्वेज) दिसला पाहिजे. अर्थात हेही लक्षामध्ये ठेवले की अति आत्मविश्वासही असणे अयोग्य असते.

फ् इंटरव्ह्यूसाठी ज्या कंपनीमध्ये तुम्ही जात आहात, त्या कंपनीविषयी तुम्ही संपूर्ण माहिती घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शक्यतो कंपनीची वेबसाईट काळजीपूर्वक पाहिली पाहिजे.

फ् कंपनीने इंटरव्ह्यूसाठी जी वेळ दिली असेल त्या वेळेपूर्वी हजर रहा.
फ् तुमचा ड्रेस फॉर्मल असावा. फॅन्सी कपडे घालण्याचे टाळावे.
फ् इंटरव्ह्यू घेणारे अधिकारी जे प्रश्न विचारतील त्यांना खरी उत्तरे द्या, शक्यतो उलट उत्तरे देणे टाळा.
फ् बोलताना तुमचे उच्चार स्पष्ट असतील, व्याकरणाच्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या.
फ् इंटरव्ह्यू घेत असलेल्या अधिका-याची नजर टाळून, अथवा इकडे तिकडे बघत उत्तरे देऊ नका.
फ् इंटरव्यहू घेणा-या अधिका-याने कितीही उलटसुलट प्रश्न विचारले तरी ‘कीप युअर पेशन्स’ मस्टच…
फ् इंटरव्ह्यू संपताना थँक्यू म्हणायला अजिबात विसरू नका.
इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात येणारे काही कॉमन प्रश्न आणि उत्तरे

१. स्वत:बद्दल सांगा : हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या प्रश्नाचे थोडक्यामध्ये उत्तरे द्या. त्यात तुमचे नाव, जन्मगाव, शिक्षण, अ‍ॅचिव्हमेंटस्, तुमचे प्लस आणि मायनस पॉर्इंट या उत्तरामध्ये येऊ द्यात.

२. आमच्या कंपनीबद्दल सांगा : या प्रश्नाच्या उत्तरात ज्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूसाठी गेला आहात, त्या कंपनीची प्राथमिक माहिती तुम्हाला असणे अपेक्षित आहे. कंपनीचे मार्केटमध्ये असलेले स्थान, सुरूवात, कंपनीची प्रगती, अ‍ॅचिव्हमेंटस याचा समावेश असावा.

३. तुम्हाला टीममध्ये काम करायला आवडेल का? : या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्ही फायनल ईयरमध्ये कोणता प्रोजेक्ट केला होता? या प्रोजेक्टमध्ये तुम्ही कशाप्रकारे सहभागी होता, हा प्रोजेक्ट करताना तुम्ही टीम मेंबर्सना कसा सपोर्ट केला होता याविषयी माहिती द्या.

४. आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी निवडले तर तुम्ही किती काळ आमच्या बरोबर काम कराल?
या गुगली पद्धतीच्या प्रश्नाचे उत्तर अत्यंत काळजीपूर्वक आणि विचाराअंतीच द्या. शक्यतो, ‘माझे इथे काम करणे आपल्या दोघांसाठी आनंदाचे असेल तोपर्यंत मी काम करेन. अर्थात, हे सगळे आपल्यामध्ये असणा-या सामंजस्यावर अवलंबून आहे,’ असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.

५. तुमची स्ट्रेंथ काय आहे? : या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक द्यावे तुमच्यामध्ये असणा-या लिडरशिप स्कील्सबद्दल सांगा. तुम्ही गुपमध्ये सर्वांसोबत काम करू शकता, एखादी नवी गोष्ट चटकन आत्मसात करू शकता असे मुद्दे या उत्तरात असावेत.

६. तुम्ही कामाचे प्रेशर असताना काम करू शकता का? : फायनल ईयरच्या प्रोजेक्टचे उदाहरण देऊन या प्रश्नाचे उत्तर दिले तर ते जास्त अ‍ॅप्रिशिएट केले जाईल. प्रोजेक्ट करण्याची डेडलाईन सांभाळत तुम्ही प्रोजेक्ट कसा पूर्ण केला आहे हे उदाहरण देत तुम्ही अंडर प्रेशर काम करू शकता हे पटवून सांगू शकता.

७. आम्ही तुम्हाला का सिलेक्ट करावे? : तुमचे शिक्षण आणि तुमच्याकडे असणारे कौशल्य कंपनीसाठी उपयोगी आहे आणि मला नोकरी दिल्यास या कौशल्याचा आणि शिक्षणाचा उपयोग कंपनीसाठी कसा होईल ते सांगा.

 

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here