हवं तेच करा !

0
295

तरुण वयात आपण खूप स्वप्नं पाहिलेली असतात. ही स्वप्नं पूर्ण झाली तर आयुष्याला एक वेगळं वळण लागेल असं त्यांना वाटत होतं. पण मध्येच काहीतरी बिघडतं आणि हे स्वप्न तुटतं. त्यावे़ळी मनात अत्यंत निराशाजनक विचार येतात.

स्वत:ला अशा प्रक्रीयेसाठी तयार ही एक परीक्षाच असते. यामध्ये स्वत:चं मन मारण्यापासून मनोवैज्ञानिक पातळीवर स्वत:ला तयार करण्याची गोष्ट येते. स्वत:बद्दल आशा आणि आकांक्षा तयार होतात आणि त्यानुसार युवा मित्र आपलं निर्धारित स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु लागतात.

पण सर्वांनाच सफलता मिळत नाही आणि असफलताच समोर येते. स्वत:बद्दल ते निराशाजनक विचार करायला लागतात आणि आपणच सगळ्यांच्या शेवटी अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते.
एक तरुण होता. त्याला डॉक्टर व्हायचं होतं. कारण त्याचे वडीलही डॉक्टर होते.

आता त्याला स्वत:ला डॉक्टरच बनायचं होतं असं म्हणण्यात कितपत तथ्य आहे? घरात वडील डॉक्टर असल्यामुळे लहानपणापासूनच त्याच्यावर डॉक्टर बनण्याचा दबाव होता. त्याने बायोलॉजी हा मुख्य विषय घेतला आणि तेव्हापासून त्याच्या मनामध्ये डॉक्टर बनण्याचं स्वप्न फुलू लागलं.

त्याला १२ वीमध्ये चांगले मार्कस मिळाले. पण तो मेडिकलच्या परीक्षेत पास होऊ शकला नाही. वडील डॉक्टर असल्याने त्यांचं त्याच्याकडे लक्ष कमीच असायचं. पण काही दिवसानंतर त्यांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी त्याला निराश न होण्याविषयी सुचवलं.

एखाद्या खासगी महाविद्यालयात डोनेशन देऊन तुला प्रवेश घेऊ आणि डॉक्टर बनवू असं त्यांनी सांगितलं. हे ऐकून त्या तरुण मित्राच्या मनाला धक्का बसला आणि तो रडायला लागला. आपल्याला कधीच डॉक्टर बनायचं नव्हतं असं तो म्हणू लागला. मग त्याच्या आई-वडिलांनी ‘तुला जे पाहिजे असेल ते कर’ असं त्याला सांगितलं.

त्यावर त्याने मॅनेजमेंटकडे जायचं आहे, असं त्याने सांगितलं. त्याने त्यामध्ये चांगली कारकीर्द घडवली आणि त्याला अमेरिकेत नोकरी मिळाली.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here