करिअर निवडताना

0
242

आपल्याला पुढे काय करायचे आहे हे ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी करिअरची निवड जास्तच अवघड असते. मात्र, थोडा वेळ दिला आणि कष्ट घेतले, तर आपल्यासाठी ही निवड सोपी होऊ शकते.

सध्याच्या काळात करिअर निवडीचे अनेक पर्याय समोर असल्यामुळे अनेकांना पुढे काय करायचे, हा प्रश्न सतावत असतो. नाहीतर सगळे करतात म्हणून मग एमबीए, मेडिसीन, आयटी या विषयांना अ‍ॅडमिशन घेतली जाते.

आपल्याला काय आवडते हे न तपासताच करिअर निवडल्याने कामाचा आनंद घेण्याऐवजी केवळ नोकरीत पाट्या टाकल्या जातात. माझ्या एका मैत्रिणीने बारावी नंतर केवळ चांगले मार्क म्हणून इंजिनीअरिंगला अ‍ॅडमिशन घेतली. मात्र, कोर्स न झेपल्याने आणि न आवडल्याने तिने एका वर्षानंतर इतरत्र प्रवेश घेतला.

अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात. आपल्याला पुढे काय करायचे आहे हे ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी तर ही निवड जास्तच अवघड असते. मात्र, थोडा वेळ दिला आणि कष्ट घेतले, तर आपल्यासाठी ही निवड सोपी जाऊ शकते.
स्वतःला समजून घ्या (अ‍ॅसेस युअरसेल्फ) : कोणत्याही प्रकारचे करिअर निवडण्याआधी आपल्या स्वतःबद्दल माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. तुमचे ध्येय, योग्यता, आवड, तुम्हाला कशात रस आहे, काय करताना आनंद मिळतो याचबरोबर आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे, हे समजून घ्यायचा प्रयत्न करा.

यासाठी आवडणा-या आणि न आवडणा-या गोष्टींची यादी करा. याबाबत, मदत म्हणून तुम्ही विविध ऑनलाईन करिअर टूलचा उपयोग करू शकता. ज्यात आपली आवड काय आहे हे विचारून योग्य करिअरची माहिती दिली जाते. अर्थात हे करूनही काही वेळा आपल्या आवडी काय आहेत किंवा आपण कोणत्या गोष्टीत चांगले आहोत, हे समजण्यातच पब्लेम येऊ शकतो.

अशावेळी आपल्या घरच्यांची, मित्र-मैत्रिणींची मदत घेऊन ही यादी तयार करावी. ही यादी तयार करताना अनावश्यक गोष्टी, जसे मला घरातील सफाई करायला आवडत नाही किंवा सिरिअल बघणे आवडते, यापेक्षा व्यवसायाशी निगडीत आवडी-निवडी लिहा,

जसे मला आकड्यांबरोबर खेळायला आवडते वा मला गणित आवडते, बायोलॉजी आवडत नाही. अशा प्रकारच्या यादीतूनच आवडीला साजेशा व्यवसायाचीच निवड करा. तुम्हाला बायोलॉजी आवडत असेल, पण रक्त पाहून चक्कर येत असेल आणि लोकांना भेटणे आवडत नसेल, तर डॉक्टर होणे हा पर्याय नाही.

व्यवसायाची यादी : तुमच्या किंवा दोस्तांच्या पालकांच्या यादीतील व्यवसायाची यादी नक्कीच मोठी असणार. तेव्हा यातील आणि करिअर टूलने सुचवलेल्या यादीतील जी नावे जास्तीतजास्त येतील ती बाजूला करा. ही तुमच्या संभाव्य करिअरची यादी.

या यादीत पाच ते दहा व्यवसायांची नावे असतील, याची काळजी घ्या. कारण, कमी असतील, तर चॉईस कमी असेल आणि यादीत जास्त नावे असतील, तर काय करायचे, याचा गोंधळ उडू शकतो.

यादीतील नावांवरून तुम्हाला जे पहिल्यांदा करायला आवडतील, असे दोन-चार व्यवसाय बाजूला काढा. ज्या संबंधी तुम्हाला जास्त माहिती काढता येईल. हे करत असताना तुमची आवड, आनंद बघायला विसरू नका. कारण तुम्हाला क्रिएटिव्ह करायला आवडत असेल आणि रुक्ष व्यवसाय निवडलात, तर त्यात क्रिएटिव्हीटीला वाव मिळणार नाही

.
व्यवसायाचे संबोधन : तुम्ही जे व्यवसाय शॉर्टलिस्ट केले होते, त्यासंबंधीची सर्व माहिती मिळवायचा प्रयत्न करा. यात व्यवसायाचे सवरूप, कामाची व्याप्ती, लागणारे शिक्षण आणि ट्रेनिंग, पुढे असलेल्या संधी, त्यातील समाधान आणि त्यात मिळणारे पैसे या सगळ्याची व्यवस्थित माहिती गोळा करा.

फस्र्ट हँड इन्फर्मेशन : सर्वांत खात्रीची माहिती मिळवण्यासाठी त्या व्यवसायात असलेल्या व्यक्ती, ओळखीचे, कौन्सिलर यांची मदत मिळू शकते. यांच्याशी चर्चा करा.

व्यवसायात येणा-या अडचणी, भवितव्याबद्दल चर्चा करा आणि शक्य असेल, तर त्या व्यवसाय करणा-याकडे काही दिवस कामाचे निरीक्षण कण्याची संधी मिळत असेल, तर त्याचा नक्की फायदा घ्या.

हे सगळे करून झाल्यावर आपल्याला कोणत्या व्वयसायात करिअर करायचे, याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. हे सर्व करत असताना काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. त्या म्हणजे…

तुम्हाला एखाद्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती नसेल, तर तो आवडत नाही असे वाटू शकते. मात्र, शिक्षण आणि ट्रेनिंगमुळे तो पुढे आवडण्याची शक्यता असू शकते.

तुम्ही स्वतःला समजावून घेण्याआधीच तुमच्या डोक्यात एखादा व्यवसाय फिट बसलेला असू शकतो. अशा वेळी त्या व्यवसायात काम करणा-यांकडून त्यांचे दैनंदिन जीवन समजावून घ्यायचा प्रयत्न करा.

याचा तुम्हालाच योग्य निर्णय घेण्याकरिता उपयोग होईल. शेवटी कोणतेही करिअर निवडले तरीही त्यातून अर्थार्जनाबरोबरच आपल्याला आनंद मिळणेही महत्त्वाचे असते

 

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here