बी सक्सेसफुल

0
254

आयुष्यात यशस्वी होणं म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा कधी प्रयत्न केलाय. यात आपण सगळ्यात जास्त विचार करतो तो आपल्या करिअरच्या यशाचा. ज्याचं करिअर यशस्वी ठरलंय तो आयुष्यात यशस्वी ठरलाय.
ज्या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केलंय, ते म्हणजे करिअरच्या नजरेतून मोजलं जातं. त्यामुळेच माणसाच्या यशाचा मंत्र म्हणजे त्याचं करिअर.

त्याने गंभीरपणे आणि यशस्वीपणे केलं, हेच म्हणता येईल.
आजची पिढी करिअरिस्टिक आहे, असं म्हणलं जातं, ते याचमुळे. या करिअरचे यश मोजायचं कसं याची प्रत्येकाची वेगळी थेअरी असते. आपण यशस्वी आहोत, हे सांगण्याचे प्रत्येकाचे निकष, मोजमाप वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपल्या कअिरचं यश नेमकं कशात आहे, हे प्रत्येकाने ठरवायचं आहे.

आपण नेमकं काय करिअर स्वीकारतो, ते आपल्या वृत्तीवर, आवडीवर आणि संधीवर अवलंबून असतं. पण त्याचं यश हे अनेकदा त्यातून तुम्ही किती पैसे कमावता यावर ठरविण्याची मानसिकता असते. अनेक घरात वडील ज्या पगारावर रिटायर झालेले असतात, तेवढा स्टार्ट घेणारी मुल असतात. पगाराव्यतिरिक्त अन्य पक्र्स मिळातात. त्यातून कार, बंगला, विकेन्ड होम अशी कितीतरी मालमत्ता करिअरच्या पहिल्या टप्प्यात मिळवणारी करिअरिस्ट तरूण मंडळी आहेत.

पैसा तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन तुम्ही वाटचाल करायला शिका. कारण आपली सगळी बिलं भरण्यासाठी पैसाच उपयोगी पडत असतो. अगदी साध्या लाईट बिलापासून ते आपल्या फॉरेन टूरपर्यंत. त्यामुळे आपल्या करिअरमध्ये कामाचं समाधान हे जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचा आहे तो त्यातून मिळणारा पैसा. काही वर्षांपूर्वी आईवडिल इंजिनीअर किंवा डॉक्टर होण्याचा आग्रह धरायचे,

त्यात अनेकदा त्यातून मिळणारा पैसा हाही विचार केलेला असावा. हेही लक्षात घ्या. अर्थात आताही एमबीए करण्याचा आग्रह धरण्यामागचं कारण हेच असतं.
करिअर यशस्वी करण्याचे मंत्र लक्षात ठेवले तर मात्र यश नक्कीच तुम्हाला मिळेल.

ध्येय ठरवा : करिअर म्हणून एखाद क्षेत्र निवडले की त्यात नेमक्या कोणत्या पदावर पोहोचायचं, हे लक्ष्य आधी ठरवा. अर्थात प्रत्येकाला टॉपलाच पोहोचायचं असतं. पण प्रत्येकाला तिथपर्यंत पोहोचणं शक्यच होत नाही.

म्हणून आयुष्यात आपलं ध्येय निश्चित न करणं चुकीचं असतं. याचा अर्थ येईल तो दिवस आपला, ही वृत्ती बाळगणं चुकीचं ठरतं. करिअरमध्ये निश्चित असं ध्येय ठरवणे खरंच गरजेचं असतं.

ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा : आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणं हेच खरं तर आपलं काम असत. करिअरमध्ये आपण ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. अनेकदा हे प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतातं. ध्येयापर्यंतची वाटचाल कशी आणि किती वेळात करायची हे आपण ठरवायचं असतं.

अपयशाला घाबरू नका : अपयश ही यशाची पायरी आहे. हे लक्षात ठेवा. कित्येकवेळा प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नाही. याचा अर्थ प्रयत्न करणं सोडणं चुकीचं ठरेल. अनेकदा मिळालेली संधी केवळ आपण नेटाने प्रयत्न केले नाहीत म्हणून अपयश आपल्या पदरी पडतं.

नाउमेद होऊ नका : अनेकदा आपण खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अपयश आल्याने अनेकदा वैफल्य येतं. नव्याने काम करण्याची इच्छाही होत नाही. पण अपयशाने नाऊमेद न होता काम करणं हेच तुमच्या यशाचं कारण ठरू शकेल.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here