यशासाठी तयार राहा

0
360

यशाचे मापदंड हे व्यक्तिगत, संस्थात्मक व्यवस्था आणि सामाजिक स्तरावर सतत बदलणारे असतात. म्हणजे एखाद्याच्या दृष्टीने समाज काय म्हणतो, याला महत्त्व असते. समाजाच्या नजरेत यशस्वी होण्यासाठी तो घडपडतो, तर एखाद्याला संस्थात्मक व्यवस्थेत जाऊन यश मिळवण्यात महत्त्व वाटते.

काहींना समाज आणि संस्थात्मक व्यवस्थेच्या यशामुळे काही फरक पडत नाही. स्वतःच्या मनात त्यांनी यशाची व्याख्या ठरवलेली असते. त्यातच त्यांना यश मिळते. तुमच्या दृष्टीने यशाचे मापदंड काय आहेत, हे लक्षात घ्या. यशाची स्वतःची व्याख्या तयार करा. या व्याख्येने तुमच्या यशाची चौकट तयार होईल आणि त्याला आकार प्राप्त होईल. जसे सैन्यात ‘मिशन’ ला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते.

‘मिशन’ यशस्वी करण्यासाठी काय आहे आणि त्यात अडथळे काय आहेत, यावर नियोजन केले जाते. ते ‘मिशन’ यशस्वी करण्यासाठी सैनिक प्राणाची आहुती देण्यासाठीसुद्धा तयार असतात. यश मिळविण्यासाठी तुम्हीसुद्धा असेच झपाटून तयार असले पाहिजे.
आयुष्यात सिद्ध परिस्थितीत राहण्याची नितांत आवश्यकता आहे. बहुतांश लोक परिस्थिती आल्यावर उपाय शोधतात; पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. लक्षात ठेवा, संधी चालून तुमच्यापर्यंत येत असते.आपल्या आजूबाजूलाही अनेक संधी असतात. तुमच्यातील गुणांच्या माहितीवरूनही अनेक लोक तुम्हाला चांगली संधी उपलब्ध करून देऊ शकतात.

मिळालेल्या संधीवर ‘मायक्रो लेव्हल’ वर प्रत्येक अंगाने काम करणे, हुकूमत मिळवणे नितांत गरजेचे आहे, तरच यश मिळे. ‘मायक्रो लेव्हल’ वर काम करण्याची एवढी सवय लागली पाहिजे की, ते तुमचे कल्चर बनले पाहिजे. जपानी लोक त्यांच्या कार्यकुशलतेच्या ‘वर्क-कल्चर’ बद्दल जगभरात प्रसिद्ध आहेत. तसं ‘वर्क-कल्चर’ अंगी बाणवण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या कामाचे नियोजन करायला सुरूवात करा.

पुस्तके किंवा लेख हे तुम्हाला यसाकडे नेण्याच्या संधीसंदर्भात अंदाज देऊ शकतात, पण संधीचं सोनं करणे हे तुमच्याच हातात आहे.
डेअर टू ड्रीम : यशाचा पहिला मंत्र म्हणजे तुम्ही स्वप्न बघितली पाहिजेत. मोठी स्वप्ने पहा आणि मोठा विचार करा, असं म्हणतात. ‘ड्रीम्स आर द मोस्ट पॉवरफुल एनर्जी इन द लाईफ’

द रिसोर्स अ‍ॅण्ड द पोटेंशिअल : कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्याकरता तुम्ही तुमच्याकडे असलेल्या क्षमता आणि संसाधनांचा विचार केला पाहिजे.

डोन्ट लूक बॅक : प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये भूतकाळात अपयश आणि चुका झालेल्या असतात. त्यांच्यापासून शिका आणि कोणत्याही परिस्थितीत भूतकाळाला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका.

प्लॅन द गोल : जागृत राहून तुम्हाला हवं असेलेल ध्येय ठरवा. त्यासाठी ‘प्लॅन’ करा, तोच तुम्हाला यशाकडे नेईल.
रूल युवर मार्इंड : स्वतःच्या मनाला ओळखा. मनात सुरू असलेल्या असंख्य विचारांच्या आंदोलनावर विजय मिळवा. यासाठी ध्यानधारणा, विपश्यना, स्वसंमोहन या गोष्टींची मदत घ्या.

नो कम्प्लेंट प्लीज : तक्रारी करण्याच्या मानसिकतेमुळे तुम्ही निगेटिव्हीटीकडे जाता. त्यामुळे यशाकडे नेणारी ऊर्जा संपुष्टात येते. आव्हानांना समस्या म्हणून पाहण्यापेक्षा संधी म्हणून बघा.

बी रिस्पॉन्सिबल : जबाबदारी घ्या, त्याला ‘बायपास’ शोधू नका.

बी एक्साईटेड टू लर्न : वाचा, ऐका आणि निरीक्षण करा. यातून तुम्हाला यशासाठी आवश्यक गोष्टी शिकता येतील.

बी सेन्सेटिव्ह : यशात कुटुंब, मित्रपरिवार हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या संबंधाबाबत संवेदनशील राहा.

डोन्ट गिव्ह अप : आयुष्यात अंतिम यश असं काहीच नसतं. प्रत्येक क्षण यशस्वी करायचा असतो. कोणत्याही अपयशाने हार मानू नका.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here