BCCL Recruitment: कोल इंडिया कंपनीमध्ये आठवी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

 

हायलाइट्स:

BCCL Recruitment

  • कोल इंडिया लिमिटेडमध्ये भरती
  • आठवी पास असणाऱ्या उमेदवारांना संधी
  • २२ नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज

BCCL Recruitment: आठवी पास असलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. कोल इंडिया लिमिटेडची सबसिडी कंपनी भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL Recruitment) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये आठवी पास असलेल्या उमेदवारांसाठी ड्राइवर पदांवर भरती निघाली आहे. कोल इंडिया लिमिटेडतर्फे अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेश जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, पगार, वयोमर्यादा, अनुभव यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. नोटिफिकेशनची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे.

 ९४ जागा भरणार
पदभरतीच्या नोटिफिकेशननुसार, ड्राइवर (T) कॅट- १ पदाच्या एकूण ९४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदभरतीमध्ये आरक्षित उमेदवारांना सरकारी नियमानुसार सवलत मिळणार आहे. त्यानुसार खुल्या वर्गासाठी ७४ जागा, एससीसाठी १४ आणि एसटीसाठी ६ जागा देण्यात आल्या आहेत.

 

महत्वाची कागदपत्रे
ड्राइवर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आठवी पास असण्यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स असणे देखील आवश्यक आहे. ड्रायव्हर्स पदांवर योग्य उमेदवारांची निवड करा ट्रेड/एप्टीट्यूड चाचणीच्या माध्यमातून केली जाणार आहे.


१०० गुणांची परीक्षा
बीसीसीएलमध्ये चालक भरती परीक्षा १०० गुणांची असणार आहे. यासोबतच उमेदवारांना ड्रायव्हिंग स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे. मुलाखती दरम्यान उमेदवाराला वाहतूक नियमांची माहिती विचारली जाईल. खुल्या वर्गातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी १०० पैकी ४० गुण असणे आवश्यक आहे. तर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी ३५ गुणांची आवश्यकता आहे.

 

बीसीसीएलमध्ये चालक भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. उमेदवारांना ड्राइवर भरती अर्ज फॉर्म बीसीसीएल अधिकृत वेबसाइट https://www.bcclweb.in/ वर जाऊन डाउनलोड करावा लागेल.

 


नोटिफिकेशननुसार २२ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कर्मचारी स्थापना विभाग, बीसीसीएल मुख्यालयाच्या पत्त्यावर नोकरी संबंधित सर्व कागदपत्रे २९ नोव्हेंबरपर्यंत पाठवता येणार आहेत.

अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा

 

 

Source link