Home Current Affairs 4 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

4 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

Small Satellite Launch Vehicle (SSLV)

चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2022)

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक SSLV :

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे.
  • Small Satellite Launch Vehicle (SSLV)असं या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून कमी वजनाचे उपग्रह, 500 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे.
  • तसेच हा नवा प्रक्षेपक एका उड्डाणात एकुण 500 किलो वजनाचे उपग्रह 500 किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करु शकणार आहे.
  • यामुळे मिनी, मायक्रो आणि नॅनो उपग्रह प्रक्षेपित करणे शक्य होणार आहे.
  • इस्त्रोचा अवघ्या 100 टन वजनाचा SSLV हा नवा प्रक्षेपक फक्त सहा जणांची टीम अवघ्या सात दिवसांत उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज करु शकते.
  • यामुळे SSLV प्रक्षेपणाच्या माध्यमातून इस्त्रोची मनुष्यबळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.
  • SSLV प्रक्षेपकाची उंची 34 मीटर असून व्यास दोन मीटर एवढा आहे. येत्या सात ऑगस्टला SSLVचे पहिले प्रक्षेपण सकाळी नऊ वाजून 18 मिनीटांनी श्रीहरीकोटा इथून होणार आहे.
  • SSLV चे पहिले उड्डाण असल्याने हे प्रायोगिक उड्डाण असणार आहे, या मोहिमेला इस्त्रोने SSLV-D1 असं नाव दिलं आहे.
  • या मोहिमेच्या माध्यमातून 135 किलोग्रॅम वजनाचा EOS 02 नावाचा मायक्रो सॅटेलाईट ( microsatellite) 350 किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केला जाणार आहे.
  • तर या उपग्रहाचा कार्यकाल हा 10 महिने निश्चित करण्यात आला असून जमिनीची छायाचित्रे काढण्याचे काम करणार आहे.
  • तर ग्रामीण भागातील 750 विद्यार्थ्यांनींनी बनवलेला आठ किलोग्रॅम वजनाचा AzaadiSAT नावाचा उपग्रहही प्रक्षेपित केला जाणार आहे.

जागतिक वनक्षेत्रात 81.7 दशलक्ष हेक्टरची घट :

  • भारतात जंगलात लागणारी आग आणि विकास वनक्षेत्र कमी होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
  • जागतिक पातळीवर देखील वनक्षेत्रात मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे.
  • गेल्या सहा दशकात जागतिक वनक्षेत्र 81.7 दशलक्ष हेक्टरने कमी झाले आहे.
  • ‘जर्नल एन्व्हायर्नमेंटल रिसर्च लेटर्स’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
  • पर्यावरणातील बदल आणि जैवविविधता हानी यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी वनपरिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावतात.

वैयक्तिक माहिती-विदा संरक्षण विधेयक मागे :

  • माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढय़ कंपन्यांनी आक्षेप घेतलेले आणि केंद्र सरकारला नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा वापर करण्यासाठी मोकळे रान देणारे ‘वैयक्तिक गोपनीय माहिती-विदा संरक्षण’विधेयक बुधवारी केंद्र सरकारने मागे घेतले.
  • संयुक्त संसदीय समितीने 81 सुधारणा सुचवल्यानंतर, केंद्रीय माहिती- तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत हे विधेयक मागे घेत असल्याचा प्रस्ताव मांडला़ त्याला आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली.
  • तर काळाशी सुसंगत नवे विधेयक आणले जाईल, असे वैष्णव यांनी लोकसभेतील निवेदनात स्पष्ट केले.
  • गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा निकाल देताना 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला वैयक्तिक माहिती-विदा संरक्षणाचा कायदा करण्याची सूचना केली होती.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात बॅडमिंटन संघाला रौप्य :

  • राष्ट्रकुल बॅडिमटन स्पर्धेत भारताला सांघिक रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • तर अंतिम लढतीत भारताला मलेशियाकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला.
  • तर एकमेव विजय ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूलाच मिळविता आला.
  • याआधी भारतीय बॅडमिंटन संघानं 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.

ज्युदोमध्ये तुलिका मानने पटकावले रौप्य :

  • भारतीय महिला ज्युदोपटू तुलिका मानचे बुधवारी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवले.
  • महिलांच्या 78 किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या सामन्यात तिचा पराभव झाला.
  • अंतिम फेरीत स्कॉटलंडची गतविजेती अॅडलिंग्टनकडून तुलिका पराभूत झाली.
  • 2022 राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे.

वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई :

  • स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय वेटलिफ्टिंगपटू लव्हप्रीत सिंगने 109 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे.
  • हे भारताचे एकूण 14वे तर वेटलिफ्टिंगमधील नववे पदक ठरले आहे.
  • त्याने स्नॅचमध्ये 163 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये 192 किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण 355 किलो वजन उचलून कांस्य पदक जिंकले.
  • कॅमेरूनच्या ज्युनियर पेरीस्लेक्सने 161 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर सामोनच्या जॅक हिटिला याने एकूण 358 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.

दिनविशेष :

  • कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म 4 ऑगस्ट 1845 मध्ये झाला.
  • पतंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म 4 ऑगस्ट 1863 मध्ये झाला.
  • साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना.सी. फडके यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 मध्ये झाला.
  • सन 1956 मध्ये भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
  • मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्‍यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सन 2001 मध्ये 4 ऑगस्ट रोजी स्थापन झाली.

Small Satellite Launch Vehicle (SSLV)

You cannot copy content of this page