हारना मना है

0
353

परिस्थिती कोणतीही आली तरी हताश व्हायचं नाही, त्या परिस्थितीला शरण जायचं नाही, आपल्याकडून होतील ते प्रयत्न करतच रहायचं असं ठरवलं तर आयुष्यात यश नक्की मिळतं हा विचार तरुणांनी कायम मनात लक्षात ठेवायला हवा. मोहन अवसारी या तरुणाने हे दाखवून दिलं आहे.

विपरित परिस्थिती असतानाही त्याने परिस्थितीवर मात करत तो यशस्वी झाला आहे. मजुरीचं काम करुन घराची आर्थिक सहाय्यता करणारा मोहन मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाकडून निवडण्यात आला आहे. आता त्याला मोठा अधिकारी बनायचं आहे आणि त्यासाठी तो आता प्रयत्नही करत आहे. मोहनच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. या उणीवांनी मोहनला बरंच काही शिकवलं.

शाळेत शिक्षण घेत असतानाच त्याने आपण मोठा अधिकारी बनायचं असं त्याने ठरवलं आणि त्यासाठी तो प्रयत्नशील राहिला. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात तो राहणारा आहे. २००३ मध्ये तो कॉलेजच्या शिक्षणासाठी इंदोरला आला. पदवीचं शिक्षण घेत असतानाच त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली. अभ्यासासाठी लागणा-या पैशांसाठी त्याने आपल्या घरच्यांना त्रास दिला नाही.

त्याने स्वत: एका ठिकाणी काम करुन पैसे मिळवले आणि त्यातून त्याने आपल्या अभ्यासाचा खर्च भागवला. कॉलेजच्या शिक्षणासाठी त्याला बराच खर्च करावा लागत असे. त्यासाठी त्याने आपल्या पोटालाही चिमटा घेतला. काटकसर करत त्याने हा पैसा साठवला आणि तो अभ्यासासाठी खर्च केला.

इंदोरमध्ये तो मजुरीही करत होता. त्यात त्याला कोणताही कमीपणा वाटला नाही. आपल्याला पुस्तकं घेण्यासाठी पैसे राहत नसत. त्यासाठी त्याने रिकाम्या वेळेत मजुरीची कामं करायचं ठरवलं. काही दिवस त्याने एका ठिकाणी हमालीचंही काम केलं.

दिवसभर काम केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असे. या अभ्यासाचा त्याला पुढील काळात फायदा झाला. अभ्यासाबरोबरच त्याने वेगवेगळ्या परीक्षा द्यायलाही सुरुवात केली. २००७ मध्ये त्याने लोकसेवा आयोगाची प्रारंभिक परीक्षा दिली. पण मुख्य परीक्षेत त्याला अपयश आलं.

तरीही मोहनने जिद्द सोडली नाही. या अपयशाने निराश न होता पुन्हा परीक्षेची तयारी सुरु ठेवली. मुख्य परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आणि आता एक सहाय्यक अधिकारी बनला आहे. कितीही अडचणी आल्या तरी हार मानायची नाही असं धोरण ठेवल्यानेच त्याला हे यश मिळू शकलं

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here