व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब

0
230

‘काय पर्सनालिटी आहे’ ! एखादी व्यक्ती भेटून जाते आणि कोणी तरी कॉमेंट करतं. पर्सनालिटी किंवा व्यक्तिमत्त्व म्हणजे नक्की कशाचं इम्प्रेशन पडलं असतं? रूपाचं की अजून काशाचं?

आपण व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व यातला फरक पाहू या! व्यक्ती म्हणजे आपलं शरीर, उंची, वजन, वगैरे मोजता येण्यासारख्या गोष्टी! रूपासारख्या अनुवांशिक बाबीही यात आल्या.

तर व्यक्तिमत्त्व म्हणजे आत्मविश्वास, दूरदृष्टी, धडाडी, पुढाकार घेण्याची वृत्ती, वगैरे न मोजता येणा-या गोष्टी. या अनुवांशिक असू शकतात किंवा यावरकोणी मेहनत घेतलेली असू शकते. एक बाब निश्चित की व्यक्तिमत्त्वात गणलेल्या या सर्व गोष्टी जरी आपल्याकडे नसल्या, तरी त्या आत्मसात करता येतात. जेव्हा कोणी इम्प्रेसिव आहे, असं म्हणतो तेव्हा आपण या गोष्टींनी प्रभावित झालेलो असतो.

आपम जर स्वतःच्या व्यतिमत्त्वाचा विकास साधत असलो, तर आपल्याला पुढील गुण जोपासावे लागतील.
१) प्रो-अ‍ॅक्टीव्ह म्हणजे पुढाकार घेणारा २) रिसोर्सफुल किंवा समयसूचक
३) ऑलराऊंडर किंवा अष्टपैलू ४) सेल्फ कॉम्फिडंट किंवा आत्मविश्वासपूर्ण
५) अ‍ॅक्युमेन किंवा दूरदृष्टी असलेला ६) डिपेंडेबल किंवा जबाबदार

जागेअभावी आपण यातल्या एखाद्या बाबीचा विकास कसा करायचा ते पाहू. पण हे सारे शब्द लक्षात ठेवायचे तर त्या सहा शब्दांमधली पहिली इंग्लिश अक्षरे पाहा आणि लेखकांचे नाव प्रसाद हे लक्षात ठेवा! तुम्हाला जर रिसोर्सफुल बनायचं असेल,तर तुम्ही नेहमीच्या गोष्टी वेगळ्या प्रकारे करायला शिकलं पाहिजे.

उदा. पट्टीने तुम्ही मोजता/रेषा आखता, पण त्याव्यतिरिक्त त्याच पट्टीचे अन्य उपोयग तुम्हाला सांगता येतील? सुमारे ३० उपयोग तर माझ्या तिसरीतल्या मुलाने शोधले होते (मारणे, बचाव करणे, खणणे, कोरणे, ढवळणे, पेपरवेट इ.) असे विविध उपयोग शोधून काढा.

विचार केलात तर तुम्हाला सहज सापडतील. (४० विविध उपोयग लिहिणा-याला मी एक बक्षीस देईन) मग अशी वस्तू वेगवेगळ्या कामांसाठी वापरा. दुसरं म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी हाताने करता, त्यातल्या काही पायाने करून पहा. उदा. एखादी गोष्ट जमिनीवरून उचलणे. असं करायला लागलात की आपोआप तुम्हला विचार करण्याची सवय लागेल. आत्ताच्या क्षणी माझ्याकडे कुठले पर्याय आहेत, कुठले रिसोर्सेस आहेत, त्यातला कुठला वापरता येईल इ. मग कुठल्याही परिस्थितीतून तुम्ही मार्ग काठू शकाल. रिसोर्सफुल बनाल.

सामान्यतः व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो तो म्हणजे अष्टपैलूत्व! अष्टपैलू मुलं कशी असतात? ही मुलं अभ्यासात एकातरी विषयांत पहिली असतात आणि शिवाय खेळातपण पुढे असतात. एखादं वाद्यही वाजवतात. शिवाय ग्रुपची पिकनिक पण तेच जमवून आणतात. तर असं कसं बनायचं? त्यासाठी तुम्हला ‘जॅक ऑफ ऑल ट्रेडस अ‍ॅण्ड मास्टर ऑफ अ‍ॅटलीस्ट वन’ बनावं लागेल. अष्टपैलू बनण्यासाठी आपल्या दादागिरीचं एक क्षेत्र प्रथम निवडा. तो अभ्यासाचा विषय किंवा एखादा खेळ असेल.

नाहीतर लोकांना हाताळणं असेल. तुमची मास्टरी कशात आहे ते जाणून घ्या नि त्यात सुधारणा करा. अष्टपैलू हा प्रत्येक क्षेत्रात यशस्वी असतोच असं नाही. तर तो अनेक क्षेत्रात प्रयत्न करतो आणि त्यापैकी कुठली निवडायची ते ठरवतो. जर तो अष्टपैलू किंवा दशपैलू असेल, तर त्याने कदाचित वीसतीस विविध विषयांत धडपड करून हे ८/१० विषय निवडले असतील. तो क्रिकेट, टेनिस आणि हॉकी खेळून त्यातला एक खेळ निवडतो.

सतार, तबला नि गिटार वाजवून पाहून त्यातलं एक वाद्य निवडतो. स्पॅनिश, चायनीज नि रशियन भाषा शिकून पाहून त्यातली एक भाषा निवडतो.
शिकण्याचे तीन प्रकार : आपण तीन प्रकारे शिकतो. स्वानुभव, परानुभव आणि समजणे. स्वानुभव किंवा फ्सर्टहँड म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतः करून पाहाणे. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट दुस-यांच्या अनुभवातून शिकता तेव्हा ते सेंकडहँड शिकणं होतं. हे वाचनामुळे असू शकतं किंवा गप्पांतून.

तिसरा मार्ग म्हणजे समजणे. तुम्ही एखाद्या गोष्टीचा अभ्यास करता आणि विश्लेषण करता. त्यानंतर परिस्थिती आणि त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम हे मनात तपासून तुम्ही तुमचं मत बनवता. अष्टपैलू व्यक्ती या तिन्ही मार्गांचा उपयोग करून शिकते. ज्या गोष्टी स्वानुभवाने शिकल्या पाहिजेत.

तिथे तुम्हाला परानुभवाचा मार्गनाही चालणार. उदा. प्रवास,.. तुम्हाला स्वतः प्रवास करून त्याचा आनंद घेतला पाहिजे. सेकंडहँड शिक्षण इथं कामाचं नाही. म्हणूनच भरपूर प्रवास करा. त्यातसुद्धा ऑफ-बिट ठिकाणे निवडा. सगळेजण प्रवासी कंपन्या दाखवतात ते पाहतात, आपण जरा वेगळ्या ठिकाणांना भेट द्यायला हवी.

हॉटेलात राहून तिथेचं जेवण, पुरेसा अनुभव येत नाही. तेथील लोकांच्या घरात राहून स्थानिक खाणं खाऊन तिथल्या जीवनमानाचा अनुभव घता येईल. असं फिरल्यामुळे तुम्ही अष्टपैलू बनून जाल! लोक म्हणतील, काय पर्सनॅलिटी आहे.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here