यशस्वी व्हायचयं ?

0
322

प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्याच्या कंपनीवरून अर्थात संगतीवरून ठरते, ही म्हण जुनी असली तरी आजच्या जमान्यात ती तितकीच चपखल ठरते. अगदी लहानपणापासून आपले मित्रमैत्रिणी चांगले असावेत, अशी शिकवण मिळत असते. अर्थात जसजसे आपण मोठे होत जात असतो, तसा हा सल्ला मागे पडतो.

पण त्या गोष्टींचं मूल्य कधीच कमी होत नाही. जेव्हा आपण मोठे होतो आणि काम करायला लागतो, तेव्हाही गोष्ट तितकिच बहुमूल्य ठरते. आपण जसं कोणत्या घरात जन्माला यावं, हे ठरवू शकत नाही, तसंच आपण आपले सहकारी कोण असावेत, हेही ठरवू शकत नाही. पण आपण जिथे काम करत आहोत, तिथल्या चांगल्या व्यक्तीपैकी आपणही असणं हे आपल्या हातात असतं.

आपण जिथे काम करतो तिथे आपल्याला अनेक वेगवेगळ्या मानसिकतेच्या, वैचारिकतेचा आणि स्तरातील व्यक्तींच्या हाताखाली काम करावं लागतं. आपल्याला अनेकदा ज्या व्यक्तींशी जमवून घेणं शक्य नसतं,
त्यांच्याबरोबरही कामासाठी संवाद साधावा लागतो. अशाच प्रकारे काम करून आपल्या कामात यशस्वी होऊन दाखवायचं असतं. पण असं करताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

पण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करून सकारात्मक विचारांनी काम केलं तर अडचणींमुळे येणारा ताण कमी केला जाऊ शकतो. कंपनीच्या भल्यासाठी काम करण्याबाबत एखादी व्यक्ती आपलं मत व्यक्त करत नसेल तर त्यांच्याशी फक्त कामापुरता संवाद साधणं योग्य ठरेल.
आसपासची स्थिती समजून घ्या. परिस्थिती काय आहे, हे जाणून घेऊन मग प्रतिक्रिया द्या. जाणून घेऊन मग प्रतिक्रिया द्या.

जर तुम्हाला आपल्या करिअरचे गोल पूर्ण करायचे असतील तर जी माणसं आपल्या आसपासच्या व्यक्तींपेक्षा कामाविषयी अधिक जागरूक आहेत, त्यांच्याशी जवळीक साधा. याचा दुहेरी फायदा होईल. एक म्हणजे तुम्हाला आधिकाधिक शिकण्याची संधी मिळेल. तुम्ही सतत कामात राहाल आणि नको असलेल्या व्यक्ती आणि गॉसिप्सपासून तुम्ही दूर राहाल.

तुमच्यावर टीका झाली किंवा नकारात्मक प्रतिक्रिया मिळाली तर खचू नका किंवा तुमच्या कामाचं कौतुक केलं तर चढून जाऊ नका. कारण अशा परिस्थितीत ज्या व्यक्ती तुमच्या आणि कंपनीच्या भल्याचा कधीच विचार करत नाही, ते फायदा घेण्याचा प्रयत्न करतात.

आपण जर आपल्या सहका-यांबरोबर प्रवास करत असाल तर त्यावेळेत किंवा लंच टाईम किंवा अन्य ब्रेकमध्ये त्यांना समजून घ्या. त्यांची मानसिकता लक्षात घ्या. संस्था किंवा व्यक्ती एखाद्या व्यक्तीविषयी अन्य व्यक्ती काय म्हणतात त्यानुसार आपली मतं तयार करू नका.

स्वत:ला आलेल्या अनुभवानंतर पुढे कसं जायचं, याचा निर्णय घ्या. प्रत्येक व्यक्ती आपल्या तर्कशक्तीनुसार आणि मूल्यांनुसार वाटचाल करत असते, त्यामुळे त्यांच्याबाबत एकदम मत बनवू नका. अगदी गरज पडलीच तर तुमच्या सकारात्मक कृतीने समोरच्यावर प्रभाव पाडू शकता.

ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, ध्येय निश्चित केलंय अशा व्यक्तींबरोबर वेळ घालवा. यामुळे तुमच्या वैचारिक प्रक्रियेवर परिणाम होतो असं नाही तर अनुभवातून शिकण्याचं शहाणपणही तुम्हाला साधतं.

ज्या व्यक्ती सकारात्मक आहेत, ध्येय निश्चित आहे, माहितीपूर्ण, बाजू घेणारे, प्रोत्साहन देणारे आणि जे तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतील, अशांच्या सहवासात राहा. तुम्हाला आयुष्यात खरंच यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्ही कोणाच्या ‘कंपनी’ त आहात, त्यावर ते अवलंबून असेल

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here